Prakash Ambedkar and VBA Sarkarnama
महाराष्ट्र

Prakash Ambedkar : 'कोण दलितांसाठी लढतंय ते ओळखा', दुरावलेली मतपेढी परत मिळवण्यासाठी प्रकाश आंबेडकर 'अ‍ॅक्शन मोड'वर

Roshan More

Prakash Ambedkar : लोकसभा निवडणुकीचा निकाल 4 जूनला जाहीर झाला. त्याच वेळी दलितांनी कोणाला मतदान केले हे स्पष्ट झाले होते. पण, तुमच्यासाठी कोण लढतयं आणि तुमची बाजू कोण मांडतयं? ते ओळखा त्याची वास्तविकता समजून घ्या असे ट्विट वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. या ट्विटद्वारे दलित मतं पुन्हा मिळवण्यासाठी आंबेडकर अॅक्शन मोडवर आल्याचे दिसत आहे.

वंचित बहुजन आघाडी तुमच्यासाठी लढत आहे. तुमच्यासाठीच लढणार आणि यापुढेही लढत राहील, असे ट्विटमध्ये प्रकाश आंबेडकर यांनी म्हणाले आहेत.

प्रकाश आंबेडकरांनी Prakash Ambedkar ट्विट करत दलित समाजावर होणाऱ्या अन्याय बद्दल बोलले आहे. निवडणूक निकालाच्या दोन दिवसानंतर बीएमसीने पवईच्या जय भीम नगर परिसरातील 700 हून अधिक घरे पाडली. कोणत्या पक्षाचे कार्यकर्ते सर्वांत आधी घटनास्थळी दाखल झाले होते? तर वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते तिथे होते.

आमच्या मुंबईच्या टीमने या दलितविरोधी अभियानाचा निषेध तर केलाच, पण जय भीम नगरमधील विस्थापित रहिवाशांचा लढा लढण्यासाठी कायदेशीर टीमही तयार केली, असे प्रकाश आंबेडकर आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

दीक्षाभूमी पार्किंगवर आवाज उठवला

दीक्षाभूमीवरील भूमिगत पार्कींग प्रकल्पाचे काम गेल्या काही आठवड्यांपासून सुरू होते. यावर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना नेतृत्वाने एक तरी शब्द उच्चारला का? वंचित बहुजन आघाडीच्या VBA कार्यकर्त्यांनी या घटनेला विरोध केला आणि त्यामुळेच या प्रकल्पाला स्थगिती मिळाली. त्यानंतरच काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेला जाग आली.

पोलिसांनी आंदोलकांवर गुन्हे दाखल केले ज्यात वंचित बहुजन आघाडीचे नागपूर अध्यक्ष आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांचा समावेश होता, असे देखील प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्र्यांची भेट

महाराष्ट्रभरातील दलितांना घरे खाली करण्यासाठी आणि गायरान जमिनीवरील पिके काढून टाकण्यासाठी नोटिसा पाठविल्या जात होत्या. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना त्यांच्या मदतीला आले का? त्यांनी एक तरी शब्द उच्चारला का? काल मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. तसेच, वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अतिक्रमण म्हणून घोषित करण्यात आलेली घरे आणि लागवडी खालील पिकांना संरक्षण मिळण्याची मागणी केली होती , जी मुख्यमंत्र्यांनी मान्य केली, असे प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटद्वारे सांगितले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT