Abha Pandey NCP re-entry And Praful Patel Sarkarnama
विदर्भ

NCP Politics : बंडखोरांना प्रवेश नाही म्हणणाऱ्या राष्ट्रवादीचा ‘यू-टर्न’! आभा पांडे पुन्हा पक्षात

NCP Praful Patel : विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीच्या विरोधात बंडखोरी करणाऱ्यांना पक्षात पुन्हा प्रवेश द्यायचा नाही असा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला होता. तसेच आदेशच पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांनी दिले होते.

Rajesh Charpe

Nagpur Political News : विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीच्या विरोधात बंडखोरी करणाऱ्यांना पक्षात पुन्हा प्रवेश द्यायचा नाही, असा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला होता. पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांनी पक्षाच्या मेळाव्यात तसे ठणकावून सांगितले होते. असे असतानाही राज्य महिला आयोगाच्या माजी सदस्य आणि तत्कालीन प्रदेश सचिव आभा पांडे यांना आज पुन्हा पक्षात प्रवेश देण्यात आला.

यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यांच्या नावाला विरोध करणाऱ्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनाही धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी काढलेल्या पत्रकात पूर्ण विचारांती आभा पांडे यांना पक्षात परत घेण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे म्हटले आहे.

आभा पांडे यांनी पूर्व नागपूर विधानसभा मतदारसंघात भाजप महायुतीचे आमदार कृष्णा खोपडे यांच्या विरोधात निवडणूक लढली होती. त्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आले होते. पांडे यांनी राष्ट्रवादी पक्षात असतानाच आपण कुठल्याही परिस्थिती निवडणूक लढणारच अशी घोषणा केली होती. आमदार कृष्णा खोपडे यांना पराभूत करणे हाच आपला उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले होते.

मात्र कृष्णा खोपडे यांनी लाखांच्यावर मते घेऊन सर्वाधिक मतांनी जिंकण्याचा विक्रम नागपूरमध्ये नोंदवला आहे. विशेष राष्ट्रवादी काँग्रेस एकसंध असतानाही त्यांनी पूर्व नागपूरवर दावा करून राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे यांचे टेंशन वाढवले होते.

दरम्यानच्या काळात अजित पवार यांनी आपला वेगळा गट स्थापन केला. दुनेश्वर पेठे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच थांबले तर आभा पांडे यांनी अजित दादांच्या गटात गेल्या होत्या. या दरम्यान त्यांना राज्य महिला आयोगाचे सदस्य करून दादांनी बळ दिले होते. त्यांच्या मतदारसंघासाठी काही कोटींचा निधीही दिला होता.

विशेष म्हणजे आभा पांडे यांनी चार सदस्यांचा प्रभाग असताना मागील महापालिकेच्या निवडणुकीत स्वबळावर विजय मिळवला होता. यापूर्वी त्या काँग्रेसच्या नगरसेविका होत्या. नागपूर महापालिका स्थायी समितीचे सभापतीपदही त्यांनी भूषवले आहे.

एक आक्रमक नेत्या म्हणून त्यांनी आपली शहरात ओळख निर्माण केली आहे. महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांना पक्षाने परत घेतले आहे. हे बघता त्या पुन्हा महापालिकेच्या निवडणुकीत लढतील असे दिसून येते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT