Nana Patole Vs Praful Patel : नानाभाऊंना प्रफुल पटेलांचा पुन्हा धोबीपछाड : दूध संघानंतर गोंदिया जिल्हा बँकेतही चारली धूळ

Nana Patole Vs Praful Patel : काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष, आमदार नाना पटोले यांना भंडारा जिल्हा सहकारी दूध संघापाठोपाठ गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतही पराभवाचा मोठा धक्का बसला.
 Nana Patole Praful Patel
Nana Patole Vs Praful Patelsarkarnama
Published on
Updated on

गोंदिया : काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष, आमदार नाना पटोले यांना भंडारा जिल्हा सहकारी दूध संघापाठोपाठ गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतही पराभवाचा मोठा धक्का बसला. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांच्या नेतृत्वातील महायुती पॅनेलचे सर्वाधिक 11 संचालक निवडून आले आहेत. तर नाना पटोले यांच्या परिवर्तन पॅनेलचे फक्त 9 उमेदवार निवडून आले आहोत. नाना पटोले यांच्यासाठी ही धोक्याची घंटा मानली जाते.

गोंदिया-भंडारा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल विरुद्ध नाना पटोले अशी वर्चस्वाची लढाई सातत्याने सुरू असते. लोकसभेचा सामना पटोले यांनी जिंकला होता. मात्र याच पटोले यांना विधानसभेच्या निवडणुकीत स्वतःच्या विजयासाठी चांगलीच कसरत करावी लागली होती. ईव्हीएमध्ये त्यांचा पराभव झाला होता. मात्र टपाल मतांनी त्यांना वाचवले. पटोले यांना पराभूत करण्याची चालून आलेली संधी गमावल्याची खंत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसला होता.

मात्र विजय होताच नाना पटोले यांनी प्रफुल पटेल आणि भाजपच्या विरोधातीस आरोपांची धार आणखी तीव्र केली होती. प्रफुल पटेल आणि आमदार परिणय फुके यांना पराभूत करण्यासाठी त्यांनी दूध संघाच्या निवडणुकीत शिवसेनेचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्यासोबत युती केली होती. मात्र त्यांच्या समर्थकांना दूध संघाच्या पाठोपाठ गोंदिया जिल्हा सहकारी बँकेतही पराभवाला सामोरे जावे लागले.

या दोन्ही निवडणुकीमध्ये पटेल विरुद्ध पटोले आणि फुके विरुद्ध भोंडेकर यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू होते. पटेल यांनी पटोले यांना चिल्लर नेते संबोधले होते. त्यामुळे चिडलेल्या नाना पटोले यांनी त्यांची जागा दाखवून देतो असे आव्हान दिले होते. दुसरीकडे आमदार फुके यांनी भोंडेकरांना युती धर्माची आठवण करून देताना तुम्ही कोणामुळे निवडून आला याचा विसर पडल्याचा आरोप त्यांच्यावर केला होता.

 Nana Patole Praful Patel
Praful Patel Vs Nana Patole : शिवसेना-काँग्रेस युतीला भाजप-राष्ट्रवादीची कडवी टक्कर; पटोले-पटेलांच्या राजकारणाचा 'पिक्चर अभी बाकी है...'

भोंडेकर यांनी मी स्वबळावर निवडून आलो असल्याचा दावा प्रत्युत्तरात केला होता. अलीकडे त्यांनी शिवसेनेचे नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समोरच कोणी आमच्या अंगावर आले तर शिंगावर घ्यायला आम्ही मागेपुढे बघणार नाही असा इशारा फुके यांना दिला होता. या वादविवादामुळे दूध संघ आणि जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

 Nana Patole Praful Patel
Praful Patel vs Nana Patole - पटेलांनी 'चिल्लर' म्हणताच, पटोलेंचाही 'एअर इंडिया' घोटाळ्यावर बोलायचं का? म्हणत इशारा!

गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 18 संचालकांसाठी निवडणूक घोषित झाली होती. याकरिता 38 उमेदवार रिंगणात होते. दोन संचालक बिनविरोध निवडून आले. भाजप-राष्ट्रवादी महायुती सहकार पॅनेलचे 11 तर काँग्रेस महाविकास आघाडीच्या परिवर्तन 9 संचालक निवडून आले आहेत. विशेष म्हणजे प्रफुल पटेल यांचा उजवा हात समजले जाणारे माजी आमदार राजू जैन बिनविरोध निवडून आले आहे. ते अध्यक्षपदाचे दावेदार आहे. या निवडणुकीत माजी आमदार दिलीप बनसोड, बँकेचे उपाध्यक्ष राधेलाल पटले, संचालक उषा मेंढे, रेखलाल टेंभरे, राजकुमार कुथे, गजानन परशुरामकर या दिग्गजांना पराभवाचा झटका बसला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com