Car of MLA Balwant Wankhede. Sarkarnama
विदर्भ

Amravati : आमदार बळवंत वानखडेंच्या वाहनाची धडक; शेतकऱ्याचा मृत्यू, पाच जखमी

Amar Ghatare

Daryapur News : आमदाराच्या भरधाव वाहनाने ट्रॅक्टरला दिलेल्या धडकेत एका शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला, तर पाच जखमी झालेत. अमरावती जिल्ह्यातील लखापूर फाट्याजवळ शुक्रवारी (ता. 22) हा अपघात घडला. दर्यापूर विधानसभा मतदार संघाचे काँग्रेस आमदार बळवंत वानखडे यांच्या वाहनामुळे हा अपघात घडला. आमदार वानखडे हे तिवसा विधानसभा मतदार संघाच्या काँग्रेस आमदार अॅड. यशोमती ठाकूरही यांच्या वाहनातून प्रवास करीत होते. त्यामुळे ते सुदैवाने बचावले.

ट्रॅक्टरमधून शेतकरी व शेतमजूर कापूस वेचणी करून घराकडे परत जात होते. अशातच आमदार वानखडे यांचे वाहन ट्रॅक्टरला धडकले. ही धडक इतकी जबरदस्त होती की, यात वानखडे यांच्या वाहनाचा पूर्ण चुराडा झाला.

दर्यापूर शहरातील एकविरा स्कूल ऑफ बिलियनमध्ये स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. काँग्रेसच्या माजी मंत्री तथा तिवसाच्या आमदार अॅड. यशोमती ठाकूर या कार्यक्रमासाठी अमरावतीहून दर्यापूरला आल्या होत्या. आमदार वानखडे आणि आमदार ठाकूर एकाच वाहनातून प्रवास करीत होते. त्यांची वाहने दर्यापूरकडे येत होते. आमदार वानखडे यांचे वाहन आमदार ठाकूर यांच्या वाहनाच्या पाठीमागेच होते. दर्यापूरपासून अवघ्या 10 किलोमीटर अंतरावर लखापूर फाट्याजवळ मजुरांचा ट्रॅक्टर शेताजवळ उभा होता. ट्रॅक्टरचे ‘टेललाइट’ बंद होते आणि त्याला ‘रिफ्लेक्टर’ही नव्हते. त्यामुळे वानखडे यांच्या वाहनावरील चालकाची नजरचूक झाली व अपघात घडला.

धडकेत शेतकरी तथा दर्यापूर सेवा सहकारी सोसायटी क्रमांक सहाचे अध्यक्ष मोहम्मद खालिक मोहम्मद अमजद यांचा जागीच मृत्यू झाला. पाच मजुरांना जबर दुखापत झाले. वानखडे यांच्या वाहनात चालक आणि त्यांचे शासकीय स्वीय सहाय्यक होते. त्यांनाही दुखापत झाले. ट्रॅक्टरमध्ये बसलेले सुरेश श्यामराव सावळे, विमाला जानराव राऊत, संगिीता संजय नांदणे, नीता उमेश सावळे, संजय सुरेश इंगळे जखमी झालेत. अपघातानंतर आमदार ठाकूर आणि आमदार अॅड. ठाकूर यांनी तातडीने शासकीय रुग्णवाहिका बोलावून घेतली. जखमींना सुरुवातीला दर्यापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यातील काहींची प्रकृती अत्यवस्थ असल्याने त्यांना तातडीने अमरावतीकडे रवाना करण्यात आले. पोलिसांनाही त्यांनी माहिती दिली. पोलिस उपअधीक्षक व दर्यापूर पोलिस स्टेशनचा ताफा अपघातस्थळी पोहोचला. त्यानंतर त्यांनी वाहतूक सुरळीत केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दोघे थोडक्यात बचावले

दर्यापूरकडे येत असताना आमदार यशोमती ठाकूर यांचे वाहन सर्वांत पुढे होते. त्यामागे आमदार वानखडे यांचे वाहन होते. लखापूर फाट्याजवळ सुरुवातीला आमदार ठाकूर यांच्या चालकालाही ट्रॅक्टर दिसले नव्हते. परंतु जवळ येताच त्याला अचानक ट्रॅक्टर दिसल्याने प्रसंगावधान दाखवत त्याने वाहनावर नियंत्रण मिळविले. आमदार ठाकूर यांचे वाहन ट्रॅक्टरला धडकले असते तर दोन्ही आमदारांना धोका निर्माण झाला असता. परंतु ठाकूर यांच्या वाहनानंतर पाठीमागून येणाऱ्या आमदार वानखडेंच्या चालकाला मात्र ट्रॅक्टर दिसला नाही आणि काळाने आपला डाव साधला.

Edited by : Prasannaa Jakate

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT