Aditya Thackeray Sarkarnama
विदर्भ

Aaditya Thackeray On CM Shinde: घटनाबाह्य सरकार फक्त वेळ मारून नेतंय; आदित्य ठाकरेंचा घणाघात

Sunil Balasaheb Dhumal

Nagpur Political News : महाराष्ट्रात सध्या अस्तित्वात असलेले राज्य सरकार हे घटनाबाह्य आहे. गेल्या दीड वर्षापासून हे सरकार संविधान आणि कायद्याशी खेळ खेळत आहे. हे सरकार फक्त वेळ मारून नेत आहे. त्यामुळे खरोखर देशात लोकशाही शिल्लक राहिली आहे का असा प्रश्न पडतो, अशा तीव्र शब्दांत ठाकरे गटाचे नेते, आमदार आदित्य ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर टीका केली आहे. (Latest Political News)

आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) नागपूर दौऱ्यावर आहेत. तेथे त्यांनी सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले, 'राज्यातील व केंद्रातील सरकार केवळ फलक आणि जाहिरातबाजीवर खर्च करीत आहे. शेतकरी आणि गरजू लोकांपर्यंत पैसा, मदत, निधी पोहोचतच नाही,' अशी टीका ठाकरेंनी केली. 'माहविकास आघाडीचे सरकार महाराष्ट्रात असताना अनेक योजना कार्यान्वित झाल्या. आताच्या सरकारने मात्र वेळकाढूपणा चालविला आहे,' असा आरोपही त्यांनी केला.

'मध्य प्रदेशात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण होत आहे. कमलनाथ यांच्या निमंत्रणावरून आपण तेथे जात आहे. मध्य प्रदेशात मराठी मतदारांची संख्या मोठी आहे. तेथील मराठी प्रचारकांचे मतपरिवर्तन करण्यासाठी ‘इंडिया’ आघाडीकडून जी भूमिका ठरेल, त्या हिशेबाचे प्रचार-प्रसाराचे काम करणार आहे,' असे त्यांनी सांगितले. तसेच मध्य प्रदेशातील निवडणुकीत ठाकरे गट उमेदवार देणार का, यावर 'हा निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरेच घेतील,' असे आदित्य यांनी स्पष्ट केले. (Maharashtra Political News)

महाविकास आघाडी सरकामध्ये गद्दारी करणारे ४० आमदार चुकीचे आहेत. त्यांच्याविरुद्ध निलंबनाची कारवाई झालीच पाहिजे, अशी आग्रही भूमिका आदित्य यांनी मांडली. ते म्हणाले, 'महाराष्ट्रात अराजकता निर्माण झाली आहे. महिलांना मंत्रिमंडळातून शिवीगाळ होते. वारकऱ्यांवर लाठीहल्ले होतात. आंदोलकांना बदडले जाते. मराठा समाजावर अन्याय होतो, परंतु त्यानंतरही सरकार काहीच करू शकत नाही. एक गद्दार आमदार गोळीबार करतो, दुसऱ्या गद्दार आमदाराचा मुलगा अपहरण करतो, असा सारा प्रकार सुरू आहे,' असा हल्लाबोलही आदित्य ठाकरेंनी केला.

'विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांची भूमिका संविधानाला न्याय देणारी असली पाहिजे. आता नार्वेकर एका पक्षापुरते मर्यादित नाहीत. अध्यक्ष या नात्याने ते एका संवैधानिक सभागृहाचे प्रमुख आहे. त्यामुळे त्यांनी संविधान व कायद्याला अनुसरून निर्णय घेतला पाहिजे,' अशी अपेक्षा आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली. अध्यक्षांनी आपली भूमिका चोखपणे बजावली, तर गद्दार आमदारांनी नक्कीच शिक्षा होईल, असेही ते म्हणाले.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT