Devendra Fadnavis news
Devendra Fadnavis news Sarkarnama
विदर्भ

Devendra Fadnavis News : उद्धव ठाकरेंनंतर 'या' आमदाराचा 'फडतूस' म्हणत फडणवीसांवर तिखट वार!

मनोज भिवगडे

Akola : माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना 'फडतूस' म्हणत डिवचलं होतं. या टीकेनंतर राज्यात काही दिवस ठाकरे-फडणवीसांमध्ये शाब्दिक चकमकी झडल्या होत्या. पण आता पहिल्यांदाच एका आमदाराने थेट फडणवीसांवर 'फडतूस' म्हणत तिखट वार केला आहे.

ठाकरे गटाचे आमदार आणि नेते आमदार नितीन देशमुख यांनी सोमवारी अकोला येथे माध्यमांशी संवाद साधला. या पत्रकार परिषदेत त्यांनी देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला आहे. देशमुख म्हणाले, एक जिल्हा परिषद सदस्याला अपात्र करण्यासाठी अधिकाऱ्यांवर दबाव टाकणारे उपमुख्यमंत्री व अकोला जिल्हा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) हे ‘फडतूस’ असून, त्यांच्याकडे कोणतीही विचारणा करणार नाही, असे वादग्रस्त विधान त्यांनी केलं आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा परिषद सदस्य गोपाल दातकर यांच्या अपात्रतेचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांनी राज्य शासनाकडे पाठविला आहे. हा प्रस्ताव पाठविण्यासाठी उपमुख्यमंत्र्यांनी दबाव आणल्याची माहिती एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिल्याचे आमदार नितीन देशमुख(Nitin Deshmukh) म्हणाले.

भाजपच्या नेत्यांवर टीका करताना आमदार नितीन देशमुख यांची जीभ यापूर्वीही घसरली होती. आता पुन्हा एकदा त्यांनी थेट उपमुख्यमंत्र्यांवर खालच्या पातळीचे राजकारण करत असल्याचा आरोप करत टीका केली आहे. भविष्यात राजकीयदृष्ट्या जड जाऊ नये म्हणून कुणाचेही नाव न घेता भाजप(BJP)च्या स्थानिक नेत्यांच्या सांगण्यावरून उपमुख्यमंत्र्यांनी विभागीय आयुक्तांवर दबाव आणल्याचा आरोपही त्यांनी केला.

याबाबत आपण अकोला दौऱ्यावर ७ ऑक्टोबरला येणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विचारणा करणार आहात काय, असा प्रश्न त्यावर उत्तर देताना आमदार देशमुख यांनी एका जिल्हा परिषद सदस्याला अपात्र करण्यासाठी दबाव आणणाऱ्या ‘फडतूस’ फडणवीसांना काहीही विचारणार नसल्याचे आमदार देशमुख म्हणाले.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT