Jayant Patil and Prakash Ambedkar
Jayant Patil and Prakash Ambedkar Sarkarnama

Jayant Patil On Prakash Ambedkar : '...तर दोघांनी पळून जाऊन लग्न करा'; जयंत पाटलांचा प्रकाश आंबेडकरांना मिश्किल टोला

Mahavikas Aghadi : आघाडीत सामील होण्यासंदर्भात दोन भडजी आडवे येत असल्याची टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली होती.

राहुल गडकर

Sangli News: गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीची युती होणार असल्याच्या राज्यात चर्चा आहेत. यासंदर्भाने वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे एका व्यासपीठावरही दिसले होते. प्रकाश आंबेडकर यांनी ठाकरे गटासोबत जवळीकता साधली खरी मात्र, ते महाविकास आघाडीसोबत अधिकृतरित्या गेलेले नाहीत. आता आघाडीत सामील होण्याच्या मुद्द्यांवरूनच आंबेडकरांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

"शिवसेनेसोबत आमची चर्चा झाली. मात्र, लग्नाची तारीख ठरवण्यासाठी दोन भडजी आडवे येत असून, एक भडजी राष्ट्रवादी तर दुसरा भडजी काँग्रेस आहे", असा खोचक टोला प्रकाश आंबेडकर यांनी लगावला होता. आता त्यांच्या या टीकेला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

Jayant Patil and Prakash Ambedkar
Ambedkar on Congress-NCP : साखरपुडा झाला; पण ‘ते’ दोन ‘भटजी’ अडथळे आणत आहेत, त्यामुळे प्रसंगी विनालग्नाचे राहू; पण...

"दोघेजण लग्नाला उत्सुक असतील आणि भडजी लग्नाला अडथळे करत असतील, तर त्यांनी पळून जाऊन लग्न करावे", असा टोला जयंत पाटलांनी प्रकाश आंबेडकर यांना लगावला. सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या आमरण उपोषणाला भेट देण्यासाठी आले असता ते बोलत होते.

"राष्ट्रवादीला कुणाचेही वावडे नाही. भाजपला विरोध हा एकच आघाडीचा मुख्य उद्देश आहे. जे पक्ष आघाडीत सहभागी होतील त्यांचे निश्चितच स्वागत केले जाईल. फक्त एकच मागणी असेल आघाडीमध्ये येऊन आघाडीची जी काही धोरणे आहेत, त्याप्रमाणे मान्य करावी लागतील", असं जयंत पाटील म्हणाले.

"जर याबाबत डॉ. प्रकाश आंबेडकर यांची भूमिका सकारात्मक असेल तर आघाडीमध्ये त्यांचे स्वागतच करेन. पण कुणाला टाळणे ही राष्ट्रवादीची आणि काँग्रेसची भूमिका असल्याचे मला वाटत नाही. शिवसेनेचे (ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी प्रकाश आंबेडकर यांची चर्चा सुरू आहे. त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतर ठाकरे आम्हाला सांगतीलच. आम्हाला सगळ्यांना सोबतच घ्यायचं आहे, आम्ही कोणालाही टाळणार नाही", असेही पाटील म्हणाले.

प्रकाश आंबेडकर नेमकं काय म्हणाले होते ?

आघाडीच्या मुद्द्यावरून बोलताना, शिवसेनेसोबत (ठाकरे गट) आमची चर्चा झाली होती. त्याची बोलणीही झाली होती. मात्र, लग्नाची तारीख ठरवण्यासाठी दोन भडजी आडवे येत आहेत. एक भडजी राष्ट्रवादी आणि दुसरा भडजी काँग्रेस आहे. हे दोन भडजी जोपर्यंत तारीख काढत नाही, तोपर्यंत आमचं लग्न ठरत नाही, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले होते.

Edited By- Ganesh Thombare

Jayant Patil and Prakash Ambedkar
Rohit Patil News: टेंभूप्रश्नी उपोषणादरम्यान रोहित पाटलांची प्रकृती बिघडली; डॉक्टरांचं पथक दाखल

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com