Satara News : देसाईंची चप्पल साडेतीनशे रुपयांची; कोणी चोरली का बघा... उदयनराजेंची मिश्किल टिप्पणी

Shambhuraj Desai पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आज खासदार उदयनराजे भोसले यांची त्यांच्या जलमंदिर पॅलेस या निवासस्थानी भेट घेतली.
Shambhuraj Desai, Udayanraje Bhosale
Shambhuraj Desai, Udayanraje Bhosalesarkarnama

Satara Udayanraje Bhosale News : जलमंदीर निवासस्थानी भेटीसाठी आलेले पालकमंत्री शंभूराज देसाई हे परत जाताना 'अरे देसाई साहेबांची चप्पल कोणी चोरली का बघा,' असे खासदार उदयनराजे मिश्किलपणे म्हणाले. त्यावर मंत्री देसाईंनी चप्पल घालतच माझी चप्पल साडेतीनशे रुपयांची असून ती खेड शिवापूर येथून घेतली आहे. मुंबईत गेल्यावर बदलणार आहे असे त्यांनी सांगताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

पालकमंत्री शंभूराज देसाई Shambhuraj Desai यांनी आज खासदार उदयनराजे भोसले Udayanraje Bhosale यांची त्यांच्या जलमंदिर पॅलेस या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यात अर्धा तास विविध विषयांवर जिल्ह्याच्या अनुषंगाने चर्चा झाली.

परत माघारी जात असताना उदयनराजे भोसलेंनी अरे देसाई साहेबांची चप्पल कोणी चोरली का बघा, यावर शंभूराज देसाई यांनी माझी चप्पल साडेतीनशे रुपयांची असून ती खेड शिवापूर येथून घेतली आहे, असे आवर्जून त्यांनी उदयनराजेंना सांगितले.

Shambhuraj Desai, Udayanraje Bhosale
Maan Political News : माणचा आमदार, माढ्याचा खासदार ठरवणारे रामराजे कोण...जयकुमार गोरेंचा सवाल

तसेच मुंबईत गेल्यावर मी ही चप्पल बदलणार असल्याचे सांगितले. यावेळी उपस्थितांत एकच हशा पिकला. मंत्री देसाई त्यांच्या शासकीय गाडीत बसण्यास निघाले, त्यापूर्वीच खासदार उदयनराजे भोसले यांनी त्यांच्या गाडीचा दरवाजा उघडला. यावेळी शंभूराज यांनी उदयनराजेंना मुजरा करत त्यांचा निरोप घेत मुंबईच्या दिशेने रवाना झाले.

Edited By Umesh Bambare

Shambhuraj Desai, Udayanraje Bhosale
Satara Loksabha News : भाजपचे मिशन सातारा लोकसभा; केंद्रीय मंत्री, प्रदेशाध्यक्ष, उपमुख्यमंत्र्यांनी घातले लक्ष...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com