Amol Mitkari , Amol Kolhe sarkarnama
विदर्भ

Amol Mitkari News :'...मग समजेल कोण सर्कशीतील वाघ'; अमोल कोल्हेंना डिवचले

जयेश विनायकराव गावंडे

Akola : वाघ जेव्हा जंगलात असतो तेव्हा तो राजा असतो, पण डरकाळी फोडणारा वाघ जेव्हा पिंजऱ्यात जातो तेव्हा काळजाला वेदना होतात. महाराष्ट्राच्या विकासासाठी गेलेल्या वाघाची अवस्था सर्कशीतल्या वाघासारखी झाली आहे, असं म्हणत राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव न घेता टीका केली. त्यावर आता राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर देत खासदार अमोल कोल्हे यांच्यावर टीका केली.

'बारामतीचे नवीन बस स्टॅन्ड पाहून जा मग समजेल कोण सर्कशीतील आणि कोण जंगलातील वाघ आहे. ज्या दादांवर आपण टीका करीत आहात त्यांनीच सुप्रियाताई आणि तुम्हाला निवडणुकीच्या तोंडावर कामाला लावले.' अशा शब्दांत मिटकरींनी कोल्हे यांच्यावर तोफ डागली.

कोल्हेसाहेब आपल्यासारख्या अतिसामान्य माणसाला शिरूरमध्ये निवडणूक लढवायला लावले. तिथे वाघ बनवणाऱ्या अजितदादांवर ज्यावेळेस काटेवाडीमध्ये जाऊन तुम्ही सर्कशीतील वाघाशी त्यांची तुलना करण्याचा प्रयत्न करत आहात. तेव्हा खरेच आपल्या उत्तुंग व्यक्तिमत्व आणि उत्तुंग बुद्धिमत्तेवर मला हसावसं वाटते, असे मिटकरी म्हणालेत.

'ज्या काठेवाडीत तुम्ही उभे आहात त्या सुनेत्रा वहिनी पवार यांनी त्या काटेवाडीचे नेतृत्व केलं आहे. जाताना जरा बारामतीचे नवीन एसटी स्टँड पण बघा कोण सर्कशीतलं कोण जंगलातील आहे. दिल्ली शहरापासून महाराष्ट्राच्या प्रत्येक व्यक्तीला माहीत आहे. या देशात विकासाचा वादा अजित दादा आहेत.' असे मिटकरी यांनी खासदार कोल्हेंना ठणकावले.

चार वर्षे आपण शिरूर लोकसभा मतदारसंघात कधीच आला नाहीत. पण आपल्याला आणि सन्माननीय वंदनीय सुप्रियाताईंना दोन्ही खासदारांना मिळून जर संघर्ष यात्रा काढावी लागत असेल आणि लोकसभेच्या तोंडावर इतके पळावे लागत असेल तर हेच दादांचे वेगळेपण आहे की. दादांनी तुम्हाला कामाला लावले आहे. तेव्हा कृपा करून दादांवर बोलताना थोडं सांभाळून बोला, असा सल्ला वजा इशाराही आमदार मिटकरी यांनी दिला आहे.

तुम्ही दादांवर जर अशा पद्धतीने बोलाल तर राज्यातील तरुण खपवून घेणार नाही.आणि बारामतीमधील लोक फार हुशार आहेत त्यांना हे सगळं माहीत आहे की येणाऱ्या काळात काय केले पाहिजे. अजितदादा हाच विकासाचा वादा आहेत. त्यामुळे तुम्ही त्यांच्याशी बरोबरी करण्याचा प्रयत्न करू नका, असा सल्लाही मिटकरी यांनी अमोल कोल्हेंना दिला.

(Edited By Roshan More)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT