Ajit Pawar on Opposation. Google
विदर्भ

Nagpur Winter Session : अजितदादांनी असे धुतले की विरोधी पक्षाला पळता भुई थोडी...

Ajit Pawar : ‘अंतिम आठवडा’बद्दल सभागृहात सकाळीच का सांगितले नाही; विचारला जाब

Atul Mehere

Vidhan Sabha : आपल्या परखड आणि रोखठोक भूमिकेसाठी ओळखले जाणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे रौद्ररूप राज्य विधिमंळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान नागपूर येथे मंगळवारी (ता. 19) सर्वांनाच बघायला मिळाले.

विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावाचं निमित्त याला कारणीभूत ठरले. संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी सायंकाळी विधानसभेच्या कामकाज सल्लागार समिती बैठकीत झालेल्या निर्णयाची माहिती दिली. बैठकीत झालेल्या निर्णयानुसार विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा बुधवारी (ता. 20) नागपूर येथे समारोप होणार आहे.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी यासंदर्भात सभागृहात प्रस्ताव मांडताच विरोधकांनी त्यावर आक्षेप घेतला. सरकार बहुमताच्या जोरावर हा निर्णय लादत असल्याचा आरोप विरोधी पक्षाने केला. यावर अध्यक्ष नार्वेकर यांनी आश्चर्य व्यक्त केले. सभागृहाच्या कामकाजाचा निर्णय सरकार घेत नाही, तर कामकाज सल्लागार समिती घेते हे अनेक वर्षांचा अनुभव असलेल्या विरोधी पक्षाला ठाऊक कसे नाही, असा प्रश्न नार्वेकर यांनी केला.

अध्यक्षांनी विरोधी पक्षावर हा बॉम्ब टाकल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रौद्र रूप धारण केले. विरोधी पक्ष उगाच सरकारवर आरोप करीत असल्याचा टोला पवारांनी हाणला. विधिमंडळाचे कामकाज कसे चालणार हे जगजाहीर होते. मंगळवारी सकाळीच अंतिम आठवडा प्रस्ताव सायंकाळी येणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्यावेळी विरोधी पक्षाचे नेते गप्प का होते, उगाच काही तरी आरोप करत सुटायचे असे नमूद करीत पवारांनी काँग्रेसला चांगलेच धुतले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पवारांच्या हा अवतार पाहिल्यानंतरही सभागृहात पुन्हा काही मागण्या विरोधी पक्षाने केल्या. आरक्षणाचा विषय गंभीर आहे. त्यामुळे त्यावर चर्चा झाली पाहिजे, अशी मागणी वारंवार रेटण्यात आली. त्यावर अजित पवार यांचा स्वर चढला. महाराष्ट्राचे सरकार हे फुले-शाहु-आंबेडकरांच्या विचारांवर चालणारे आहे. कोणत्याही समाजावर अन्याय होऊ न देता आरक्षण देणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी भर सभागृहात सांगितले आहे. त्यानंतरही काय सांगता, असे पवार संतप्त स्वरात म्हणाले. त्यानंतर मात्र सभागृहात अंतिम आठवडा प्रस्तावाला सुरुवात झाली. नाना पटोले यांनी मुद्दे मांडले होते.

हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाल्यापासून अजितदादा आणि त्यांच्या गटातील नेते चर्चेत होते. नागपूर मेट्रो सफारीदरम्यान दादांच्या ‘ड्रेसिंग स्टाइल’ने सर्वांचे लक्ष वेधले. त्यानंतर विदर्भासाठी खास विशेष कार्य अधिकारी (ओएसडी) नेमण्याचा निर्णय पवारांनी जाहीर केला. त्यामुळे सत्तेत असो किंवा विरोधी पक्षात, दादा नेहमीच ‘छाये रहते है..’ अशी चर्चा पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात रंगली.

Edited by : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT