Nagpur Winter Session : पटोले मागणी करीत राहिले, पण उत्तर द्यायला मंत्रीच नव्हते!

Nana Patole : विधानसभेत पुन्हा रेटला अधिवेशन कालावधी वाढविण्याचा मुद्दा
Nana Patole in Vidhan Sabha.
Nana Patole in Vidhan Sabha.Google
Published on
Updated on

Vidhna Sabha : नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशन संपायला आता काही तासांचा अवधी शिल्लक असताना आणखी दोन दिवस हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याची मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी मंगळवारी (ता. 19) विधान सभेत पुन्हा एकदा केली आहे.

विदर्भातील समस्यांवर चर्चा करण्यासाठी आणखी दोन दिवस लागणार आहेत. त्यामुळे अधिवेशनाचा कालावधी दोन दिवसांनी वाढवावा अशी मागणी पटोले गेल्या दोन दिवसांपासून विधान सभेत करीत आहेत. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पटोलेंना यासंदर्भात समिती निर्णय घेणार असल्याचे सांगितले आहे. अशात पटोले यांनी आज कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर पुन्हा हा मुद्दा उपस्थित केला.

Nana Patole in Vidhan Sabha.
Nagpur Winter Session: हिवाळी अधिवेशन लांबणार की गुंडाळणार ?

पटोले नागपूर येथे विधानसभेत या मुद्द्यावर आक्रमकपणे बोलत होते. परंतु त्यांचे समाधान करण्यासाठी सरकारमधील एकही मंत्री विधानसभेत उपस्थित नव्हता. त्यामुळे त्यांनी सभागृहात तीव्र नाराजी व्यक्त केली. विधानभवन परिसरात प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी सरकारबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. सरकारला विदर्भातील प्रश्नांबाबत कोणतंही सोयरंसूतक नसल्याची टीका त्यांनी यावेळी केली.

नागपूर येथील राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबरपासून सुरुवात झाली. बुधवारी (ता. 20) अधिवेशन संपणार आहे. विदर्भातील अनेक प्रश्न अद्यापही प्रलंबित आहेत. आमदार नाना पटोले याबद्दल म्हणाले की, विदर्भाचे प्रश्न आम्ही 290 कलमाअंतर्गत सभागृहात मांडले आहेत. त्यावर उत्तर द्यायला मंत्री हजर नाहीत. ही बाब अध्यक्षांच्या लक्षात आणून दिली. अध्यक्षांनीदेखील अधिवेशनाचा कालावधी वाढविण्याची भूमिका मांडली आहे. अर्थमंत्री जरी म्हणाले की, विदर्भाचा अनुशेष संपला तरी विदर्भाच्या प्रश्नांची यादी मोठी आहे. विदर्भ विकास मंडळ कार्यरत नाही. त्यामुळे दोन दिवस अधिवेशन वाढविण्याची गरज आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

केंद्रातील 78 खासदारांच्या निलंबनासंदर्भात पटोले रोष व्यक्त केला. पटोले म्हणाले, ‘भाजपला लोकशाही मान्य नाही. त्यामुळेच खासदारांचे निलंबन करण्यात आले आहे.’ मोदी सरकारने दहा वर्षांत विकास केला असेल तर त्यांना रथयात्रा काढण्याची गरज नाही. भाजप सरकारने देशाला लुटले आहे. हे पाप लपविण्यासाठी रथयात्रा काढण्यात येत असल्याचा आरोपही, आमदार नाना पटोले यांनी केला. धार्मिकतेच्या मुद्द्यावर मोदी सरकार लोकांना गुंतवत आहे, अशी टीकाही त्यांनी केंद्र सरकारवर केली.

काँग्रेसच्या नेत्यांनी अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याची मागणी केलीय मात्र सत्ताधाऱ्यांकडून त्याला विरोध आहे. या अनुषगांने विधानसभा कामकाज सल्लागार समितीची बैठक बुधवारी दुपारी तीन वाजता आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीची दुपारी साडेतीन वाजता होत आहे. ही बैठक महत्त्वाची आहे. विरोधी पक्षाच्यावतीने करण्यात आलेल्या मागणीवर या बैठकीत चर्चा होणार आहे, असे पटोले यांनी सांगितले.

Edited by : Prasannaa Jakate

Nana Patole in Vidhan Sabha.
Nagpur Winter Session : विदर्भातील प्रश्नांसाठी अजितदादाही नेमणार खास ‘ओएसडी’

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com