Navneet Rana, Ajit Pawar Sarkarnama
विदर्भ

Amravati politics : ज्या गावच्या बोरी असतात त्याच गावात बाभळीसुद्धा असतात; अजितदादांचा नवनीत राणा यांना इशारा

Ajit Pawar speech News : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माजी खासदार नवनीत राणा यांना दिला.

Rajesh Charpe

Aamravati News : आपली राजकीय पोळी शेकण्यासाठी कोणी दादागिरी करीत असेल, दहशत माजवत असेल, जाती धर्मांमध्ये भांडणे लावून गुंडगिरी करीत असेल तर ती मोडून आम्ही मोडून काढू शकतो, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माजी खासदार नवनीत राणा यांना दिला. यावेळी त्यांनी कोणी तुम्हाला भडकावत असेल तर डोकी शांत ठेवा असाही सल्ला अमरावतीकरांना दिला.

चार दिवसांपूर्वी नवनीत राणा यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांनी उद्देशून मर्यादेत राहावे, भाजपवर आरोप करताना सांभाळून बोलावे असा सल्ला दिला होता. त्यानंतर महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी अजितदादा शुक्रवारी अमरावतीत आले होते. ते राणा यांच्यावर काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. तत्पूर्वी अमरावतीच्या आमदार सुलभ खोडके यांनी आपल्या भाषणात माजी खासदार या समाजासमाजामध्ये विष कालवत असल्याची तक्रार केली. यात लक्ष घाला आणि अधिकाऱ्यांना सांगून ॲक्शन घेण्याची मागणी त्यांनी केली.

यावेळी अजितदादांनी नवनीत राणा (Navneet rana) यांच्या नावाचा कुठलाही उल्लेख केला नाही. त्यांनी भाषणातून खास आपल्या शैलीत राणा यांचा समाचार घेतला. ते म्हणाले ज्या गावच्या बोरी असतात त्याच गावात बाभळीसुद्धा असतात हे त्यांनी लक्षात ठेवावे. उभे करायला अक्कल लागते मात्र विध्वंस घडवून आणायला काही लागत नाही, असा टोलाही त्यांनी लागावला.

नुसती भाषणे आणि वाद उभे केल्याने जनतेचे प्रश्न सुटत नाहीत. त्यामुळे मी येथे कुणाच्या भावना भडकावला आलो नाही. ज्या शहरात जातीय सलोखा आणि शांतता नसते तेथे विकास होत नसतो. कुठलाही उद्योगपती अशा शहरात गुंतवणूक करत नाही. मी गेली ३५ वर्ष राजकारणात आहोत. मी कामाचा माणूस आहे. विकास कसा करायचा असतो हे मी बारामतीत करून दाखवले आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेची आमच्या हाती असताना किती मोठा कायापालट झाले हे समोर आहे. त्यामुळे कोणी जाती धर्माच्या नावाखाली भडकावत असले तर त्यांना माझे एवढेच सांगणे आहे. याचा सर्वाधिक फटका गरीब माणसाला बसतो. व्यापाऱ्यांना बसतो. अशा शहराचा विकास होत नसतो असेही अजित पवार आपल्या भाषणात म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT