Nashik News, 09 Jan : महापालिका निवडणुकीत काल एका पक्षाने जाहीरनाम्यात आश्वासनांचा पाऊस पाडला. याच पक्षाच्या सहकारी शिंदेंच्या शिवसेनेने शहरातील बांधकाम व्यवसायिकांना खुश करून टाकले. त्यामुळे हाती काय पडेल याची शाश्वती नसताना आश्वासनांची खैरात चर्चेत आहे.
नगरपालिका निवडणुकीत अनेक ठिकाणी थेट जाहीर सभेतून एकनाथ शिंदे फोन लावत. उद्योग मंत्री उदय सामंत एमआयडीसी मंजूर केली अशी घोषणा करीत असत. निवडणूक प्रचारातील ही फोन स्ट्रॅटेजी वादाचा विषय ठरली होती.
नाशिक महापालिका निवडणुकीत पुन्हा त्याची पुनरावृत्ती झाल्याने चर्चेचा विषय आहे. उद्योग मंत्री उदय सामंत यांनी काल बांधकाम व्यवसायिकांची चर्चा केली. यावेळी त्यांनी चक्क शहरातील 4000 इमारतींचा एफएसआय वाढवून देण्याची आभाळा एवढी घोषणा करून टाकली.
यावेळी त्यांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन लावला. त्यानंतर मंत्री सामंत यांनी शहरातील इमारतींचा एफएसआय वाढवून देण्याचा विषय सांगितला. त्यानंतर बांधकाम व्यवसायिक उदय घुगे यांना फोन दिला. त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी एका झटक्यात शहरातील चार हजार इमारतींचा एफएसआय वाढविण्याचा निर्णय सांगितला. यावेळी उपस्थित आणि आनंदाने टाळ्या वाजवल्या.
यावेळी उदय सामंत यांनी तपोवन आतील झाडे तोडून प्रदर्शन केंद्र उभारण्याच्या निर्णयावरही आपली भूमिका मांडली. या ठिकाणी केंद्र होणार नाही असे त्यांनी सांगितले. महापालिकेने नवी जागा दिल्यास मात्र नव्या ठिकाणी केंद्र उभारू, असे सांगत भाजपवर राजकीय कुरघोडी केली.
यावेळी सावंत यांनी विविध उद्योजक आणि बांधकाम व्यवसायिकांशी चर्चा केली. त्या मागण्यांबाबत उपमुख्यमंत्री शिंदे तातडीने निर्णय घेतील. शहराच्या विकासासाठी नगर विकास विभागाचे मंत्री असताना शिंदे यांनी हजारो कोटींचा निधी दिल्याचा दावा त्यांनी केला. नगरपालिका निवडणुकीत एकनाथ शिंदे हे उद्योगमंत्र्यांना फोन लावत असत. भरसभेतून फोन स्पीकरवर ठेवत येथील युवकांना रोजगार हवा आहे.
'एमआयडीसी' ची मागणी आहे, असे सांगत. त्यावर उदय सामंत यापूर्वीच मागणी मान्य केली आहे तातडीने कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन देत असत. नगरपालिका निवडणुकीतील उपमुख्यमंत्री शिंदे यांची फोन प्रचार स्ट्रॅटेजी हा विरोधकांसाठी टिकेचा विषय बनला होता. त्याची पुनरावृत्ती पुन्हा एकदा नाशिकमध्ये झाली आहे. यावेळी उदय सामंत यांनी एकनाथ शिंदे यांना फोन लावला हाच काय तो फरक.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.