AIMIM BJP alliance Sarkarnama
विदर्भ

AIMIM BJP alliance : 'AIMIM'नं बिनशर्त पाठिंबा काढून घेतला; भाजपच्या अकोट मंचासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनाही धाडलं पत्र!

AIMIM–BJP Alliance Broken in Akot Municipal Corporation, Akola District : अकोला इथल्या अकोट नगरपालिकेत भाजपने 'AIMIM' बरोबर स्थापन केलेल्या शहर विकास मंचाची यादी सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागली आहे.

Pradeep Pendhare

Akot city politics : अकोला जिल्ह्यातील अकोट नगरपालिकेत भाजप-'AIMIM' युतीमुळे राज्यात खळबळ उडाली होती. भाजप-'AIMIM'ची युती मात्र राहिली. या युतीवर राज्यात चर्चा होत आहे.

आता या युतीतून बिनशर्त बाहेर पडत, असल्याचे 'AIMIM'ने जाहीर केले आहे. तसे पत्र आता समोर आलं आहे. दरम्यान, 'अकोट शहर विकास मंच'ला जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या मान्यतेचं पत्र सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागलं आहे.

अकोट नगरपालिकेत सत्ता मिळवण्यासाठी भाजपनं (BJP) थेट 'AIMIM'शी युती केली. 'बटेंगे तो कटेंगे'ची घोषणा देणाऱ्या भाजपनं थेट 'AIMIM'शी युती केल्याचे तीव्र पडसाद उमटले. याची चर्चा देशभरात झाली. दस्तुरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर भाष्य करत नाराजी बोलून दाखवली. यानंतर आता एक महत्त्वाची घडामोड समोर आली आहे.

अकोट शहराचे 'AIMIM'चे शहराध्यक्ष आरीफ शहाह हन्नान शाह यांनी, 'AIMIM'चे पाच नगरसेवक रेश्मा परवनी मोहम्मद अजीम, युसूफ खान हादीक खान, हन्नान शाह सुलतान शाह, दिलशाद बी रज्जाक खाँ आणि अफरीन अंजुम मो. शरीफोद्दीन यांचा भाजपबरोबर असलेला शहर विकास मंचाचा पाठिंबा काढून घेतला असल्याचे पत्र काढले. असेच पत्र 'AIMIM'चे प्रदेश उपाध्यक्ष युसुफ मोहम्मद शफी पुंजानी यांनी देखील आकोट शहर विकास मंचाला पत्र देत पाठिंबा बिनशर्त मागे घेत असल्याचे म्हटले आहे.

अकोट नगरपालिकेत हिंदुत्ववादी भाजपने 'AIMIM'ला बरोबर शहर विकास मंचाची स्थापन केली होती. नगरपालिकेत बहुमत नसलेल्या भाजपने 5 नगरसेवक असलेल्या 'AIMIM'ला सोबत घेतलं. या युतीचे राज्यासह देशात पडसाद उमटले. भाजपबरोबर 'AIMIM'ला देशभरात विरोधकांनी जोरदार ट्रोल केलं. यानंतर 'AIMIM'ने या शहर विकास मंचातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान, 'अकोट शहर विकास मंचा'ला अकोल्याचे जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी मान्यता दिल्याचं, हे पत्र समाज माध्यमांवर समोर आलं. 'AIMIM', शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्ष, एकनाथ शिंदे शिवसेना, अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष आणि बच्चू कडूंची 'प्रहार जनशक्ती पार्टी यात सहभागी असल्याचे दिसून येतं.

मात्र यात, भाजप 'AIMIM'ची युतीची मोठी चर्चा झाली. या युतीवर भाजप नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि 'AIMIM'चे नेते असदुद्दीन ओवैसी प्रचंड नाराज झाले. त्यानंतर 'AIMIM'ने दिलेल्या आकोट शहर विकास मंचाला दिलेलं समर्थन मागे घेतल्याचे पत्र समोर आलं. ते पत्रही 'AIMIM'ने जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपुर्द केलं. परंतु अद्यापपर्यंत 'AIMIM'च्या पत्रावर काय कारवाई झाली? हे अजून समोर आलेलं नाही. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांनी अकोट शहर विकास मंच या गटाला दिलेल्या मान्यता दिल्याचे हे पत्र आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT