BJP Mayor Sharda Khedkar Sarkarnama
विदर्भ

Akola councillors suspended : अकोल्यात राजकीय भूकंप! 16 नगरसेवक सस्पेंड; महापौर शारदा खेडकरांनी का उचलला कठोर निर्णय?

BJP Mayor Sharda Khedkar suspends 16 councillors from Congress, Shiv Sena Thackeray faction, and VBA for three sessions during Akola civic budget meeting : अर्थसंकल्पीय सभेतील गोंधळावरून अकोला महापालिकेतील 16 नगरसेवकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

Pradeep Pendhare

Akola Municipal Corporation news : अकोला महापालिकेच्या अर्थसंकल्पीय सभेत गोंधळावरून महापौर शारदा खेडकर यांनी तब्बल 16 नगरसेवकांवर निलंबनाची कारवाई केली.

राज्यात पहिल्यादांच एवढ्या मोठ्याप्रमाणात नगरसेवकांना निलंबनाची कारवाईची ही पहिलीच वेळ आहे. ही कारवाई राज्यातील राजकीय विश्वात चर्चेचा विषय ठरली आहे. या नगरसेवकांना पुढील तीन सभांसाठी निलंबित करण्यात आलं आहे

अकोला (Akola) महापालिकेची अर्थसंकल्पयी सभा होती. या सभेत विरोधी नगरसेवक शहरातील घंटागाड्या मोफत सुरू ठेवाव्यात अशी मागणी मागणी करत असतानाच, सत्ताधाऱ्यांनी असंविधानिक शब्द वापरला. यावरून सभेत गदारोळ झाला. विरोधकांनी महापौरांच्या समोर येत ठिय्या आंदोलन सुरू केला.

सत्ताधारी नगरसेवकांनी असंविधानिक शब्दावर माफी मागून देखील विरोधकांनी आंदोलन सुरूच ठेवलं. '50 खोके एकदम ओके', अशी जोरदार घोषणाबाजी झाली. विरोधकांच्या ठिय्या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीच्या (VBA) नगरसेवकांबरोबर काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे नगरसेवक देखील सहभागी झाले.

विरोध नगरसेवकांच्या ताकदीपुढे सत्ताधारी काहीसे मागे फिरले. विरोधकांनी सभेत ठिय्या देत आंदोलन सुरू ठेवलं. यातच महापौर शारदा खेडकर या आक्रमक झाल्या आणि वारंवार समजावून देखील, माफी मागून देखील विरोधी नगरसेवक शांत होत नसल्याने थेट नगरसेवकांवर निलंबनाची कारवाई केली. एकाचवेळी तब्बल 16 नगरसेवकांवर निलंबनाची कारवाई केली.

महापौरांचा 16 नगरसेवक निलंबनाचा आदेश

महापौर शारदा खेडकर यांनी निलंबनाची कारवाई केल्यानंतरही नगरसेवकांचा ठिय्या आंदोलन सुरू होतं. पोलिसांना पाचारण करण्यात आलं. तरी देखील नगरसेवक ठाम होते. महापौर शारदा खेडकर यांनी पुन्हा एकदा निलंबित नगरसेवकांना सभागृहाबाहेर पाठवण्याचा अधिकार, नियम वाचून दाखवला. त्यानंतर विरोधी नगरसेवक घोषणाबाजी करतच बाहेर पडले.

सत्ताधाऱ्यांनी सभा भरकटवली

वंचितचे नगरसेवक पराग गवई, स्वीकृत नगरसेवक सुनील इन्नानी आणि नगरसेवक नीलेश देव यांनी सत्ताधाऱ्यांच्या या कारवाईचा निषेध केला. असंविधानिक शब्द वापरून सत्ताधाऱ्यांनी सभागृहाची दिशाभूल केली. लोकांच्या हिताची मागणी करत असताना सत्ताधारी नगरसेवकांनी असंविधानिक शब्द वापरला अन् गोंधळला सुरवात झाली. आम्ही पण बाळासाहेब आंबेडकरांचे सैनिक आहोत. लोकांच्या हितासाठी लढत राहू, असा इशारा या कारवाई दिला आहे.

या 16 नगरसेवकांवर कारवाई

मौउफ फजुल, आझाद खान, पराग गवई, नीलेश देव, शेख शमशूर, जिशान हुसेन, विजय इंगळे, शंकर लंगोटे, नीलोफर खान, आकाश कवडे, अभय खुमकर, मैमूना बी, आर्शिया परवीन, उज्ज्वला पातोडे, सुवर्णरेखा विजय जाधव, जयश्री बहादुरकर यांना निलंबित करण्यात आलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT