

Shiv Sena political crisis : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेच्या खासदार ज्योती वाघमारे यांनी, राज्यात लवकरच 'ऑपरेशन टायगर' होणार असल्याचे संकेत दिलेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे खासदार-आमदार संपर्कात असल्याचे संकेतही खासदार वाघमारे यांनी दिले होते.
शिवसेना ठाकरे सेना पक्षाला पुन्हा खिंडार पडणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. यातच शिवसेना ठाकरे सेना पक्षाचे आमदार वरुण सरदेसाई यांनी, 'त्यांचेच आमदार-खासदार आमच्याही संपर्कात आहेत', असा दावा करत खळबळ उडवून दिली आहे.
शिवसेना (Shivsena) ठाकरे सेना पक्षाचे आमदार वरुण सरदेसाई यांनी, नवी मुंबई महापालिका मुख्यालयात शिवसेना ठाकरे पक्ष कार्यालयाचे उद्घाटन केले. भाजप अन् एकनाथ शिंदे शिवसेना राज्यात नावाला सत्तेत सहभागी आहे. राज्यात त्यांच्यात एकमेकांवर कुरघोड्याचं राजकारण रंगल आहे, असा टोला आमदार सरदेसाई यांनी लगावला.
एकनाथ शिंदे (Eknath Shinde) शिवसेनेच्या खासदार ज्योती वाघमारे (Jyoti Waghmare) यांनी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे आमदार-खासदार संपर्कात असल्याचे जाहीर संकेत दिले होते. यावरून राज्यात 'ऑपरेशन टायगर' सुरू असल्याची चर्चा होती. यावर वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया उमटत असतानाच, आमदार सरदेसाई यांनी खळबळजनक प्रतिक्रिया दिली.
आमदार वरुण सरदेसाई म्हणाले, "संपर्कात सगळेच सगळ्याचाच असतात. त्यांचे सुद्धा अनेक लोकं आमच्या संपर्कात असतात. महाराष्ट्रात सत्ताधाऱ्यांकडे 220 आमदार आहेत. विरोधकांचे फक्त 40 आमदार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीत सत्तेचा आणि पैशाचा मोठ्या प्रमाणात वापर झाला, हे सर्वांनीच पाहिले."
'एवढं सगळ असताना, अजूनही तुम्हाला एवढी हाव का? तुमच्याकडे असलेले कार्यकर्ते घेऊन पुढे का जात नाही, वारंवार दुसऱ्यांनी जन्म घेतलेली पोरं का खांद्यावर घ्यावा वाटतात?' असा खोचक सवाल आमदार सरदेसाई यांनी केला.
नांदेड दौऱ्यात खासदार वाघमारे यांनी 'ऑपरेशन टायगर' किंवा 'ऑपरेशन तुतारी' होणार, जे पण होणार ते योग्य वेळी होणार असल्याचे केलं होतं. खासदार वाघमारे यांच्या या विधानाला, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनीही देखील उत्तर दिलं आहे.
शशिंकात शिंदे यांनी, जनतेच्या प्रश्नावर बोलतील, अशी अपेक्षा आहे. पण, दिल्लीत गेल्यानंतर त्या ऑपरेशन कधी करायला लागल्या, हे मला कळत नाही. सत्ताधारी पक्षाकडे एवढं बहुमत असताना हे फोडोफोडीचं राजकारण का केलं जात आहे, हे कळत नाही, असा टोलाही लगावला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.