Akola Clash : काँग्रेस vs AIMIM नगरसेवकांमध्ये रणांगण! हाणामारी, दगडफेक, धारदार शस्त्रानं वार अन् पाच जखमी...

Violent clashes erupted between supporters of Congress corporator Abdul Karim and AIMIM corporator Syed Rahim Syed Hasham in Akola Akot Fail area : काँग्रेस आणि 'AIMIM'च्या अकोला महापालिकेच्या निवडणुकीपासून सुरू झालेल्या वादानं आता उग्र रूप घेतलं आहे.
Akola Clash
Akola ClashSarkarnama
Published on
Updated on

Congress AIMIM fight Akola : अकोला महापालिका निवडणुकीपासून काँग्रेस आणि 'AIMIM'च्या नगरसेवकांमध्ये सुरू झालेला राजकीय राड्यानं आता उग्र रूप धारण केलं आहे. अकोला शहरातील अकोट फैल भागात दोन्ही पक्षाच्या नगरसेवकांमध्ये किरकोळ वादातून, समर्थकांमध्ये तुफान दंगल झाली.

हाणामारी, दगडफेक, धारदार शस्त्रांनी एकमेकांवर वार झाले. पाच जण गंभीर जखमी झाले असून, यातील एकावर धारदार चाकूने वार झाला आहे. चाकूने वार झालेल्या व्यक्तीची प्रकृती गंभीर असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अकोला इथं काँग्रेस (Congress) आणि 'AIMIM' मधील राजकीय वाद विकोपाला गेले आहेत. अकोट फैल भागात दोन्ही 'AIMIM'चे नगरसेवक सय्यद रहीम सय्यद हाशम आणि काँग्रेसचे नगरसेवक अब्दुल करीम यांच्यात किरकोळ वाद झाला. या वादातून पुढे दोघांमध्ये झटापटी झाली. हाणामारी झाली.

काँग्रेस अन् 'AIMIM'च्या या दोघा नगरसेवकांबरोबर त्यांचे समर्थक होते. त्यानंतर समर्थक देखील भिडले. यातून तुफान राडा सुरू झाला. हाणामारी सुरू असतानाच, दोन्ही बाजूने दगडफेक झाली. दंगलसदृश परिस्थितीमुळे परिसरात पळापळ सुरू झाली. यातच दोन्ही बाजूने धारदार शस्त्र काढण्यात आली.

Akola Clash
Instagram Ban : सरकारची पोलखोल, विठ्ठल कांगणेंच 'इन्स्टा' अकाउंट क्लोज! खरात प्रकरणात नवा ट्विस्ट; सुजात आंबेडकर मैदानात

दगडफेकीत तब्बल, चार पेक्षा जास्त लोक जखमी झाले. चाकूच्या हल्ल्यात एक जण गंभीर जखमी झाला. यानंतर परिस्थिती अधिक चिघळणार, तेवढ्यात पोलिसांनी तिथं धाव घेतली. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. गंभीर जखमीला रूग्णालयात दाखल करण्यात आलं असून, त्याची प्रकृती गंभीर असल्याचं सांगितलं जात आहे.

Akola Clash
Rupali Chakankar Controversy : शिक्षिकेवर हल्ला, शेकडो युवक भोंदूगिरीच्या विळख्यात; रूपाली चाकणकरांचा 'बुवा-बाबा संरक्षण आयोग' रंजना गवांदेंकडून एक्सपोज!

'AIMIM' गृहीत धरलं

'AIMIM' आणि काँग्रेसचे नगरसेवकांमध्ये महापालिका निवडणुकीपासून अंतर्गत राजकीय धुसफूस वाढली आहे. अकोला महापालिकेत सत्तास्थापनेसाठी 41 चा आकडा हवा होता. काँग्रेस, उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी एकजूट दाखवत होती. मात्र मतदानवेळी फक्त 32 मते मिळाली.

धुसफूस वाढीचं कारण....

काँग्रेस, उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीने 'AIMIM'ला गृहीत धरले होते. परंतु ऐन मतदानाच्या दिवशी 'AIMIM'च्या तीन नगरसेवकांनी तटस्थ राहिले. भाजपकडे स्वतःचे 38 नगरसेवक असतानाही त्यांनी मित्रपक्ष आणि अपक्ष नगरसेवकांना सोबत घेत 45 मतांचा भक्कम आकडा गाठला. महापालिकेतील सत्ता स्थापनेपासून काँग्रेस अन् 'AIMIM'मध्ये सुरू झालेल्या राजकीय वाद अजून धुसफूसत आहे.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com