Akola News : महानगरपालिका निवडणुकीनंतर अकोला जिल्हा चांगलाच चर्चेत आला होता. अकोला महापालिकेच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप झाला आहे.यावेळी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं थेट उद्धव ठाकरेंना मोठा धक्का दिला आहे, ठाकरेंच्या शिवसेनेच्या 4 नगरसेवकांनी तडकाफडकी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला आहे.
अकोला महापालिकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आलेल्या नगरसेवक सागर भारुका, मनोज पाटील, सुरेखा काळे आणि सोनाली सरोदे यांनी मंगळवारी (ता.23 मार्च) पक्षाला सोडचिठ्ठी देत थेट एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामुळे अकोल्यासह विदर्भाचं राजकारण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे.
नगरसेवकांनी केलेल्या या बंडानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे गटनेते विजय इंगळे यांनी थेट अमरावती विभागीय आयुक्तांकडे या प्रकरणी दाद मागितली आहे. नगरसेवक सागर भारुका, मनोज पाटील, सुरेखा काळे आणि सोनाली सरोदे यांनी पक्ष शिस्तभंग केल्याप्रकरणी या सर्व नगरसेवकांना अपात्र ठरवण्यात यावं, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
तसेच नगरसेवकांच्या या तडकाफडकी निर्णयामुळे उद्धव ठाकरेंची शिवसेना प्रचंड संतापली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेकडून नगरसेवकांचा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतील पक्षप्रवेशाचा हा निर्णय पूर्णपणे बेकायदेशीर असल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणात प्रशासनाने ताबडतोब हस्तक्षेप करण्याची विनंतीही ठाकरेंच्या शिवसेनेकडून करण्यात आली आहे.
या सगळ्या राजकीय घडामोडींनंतर अकोला महापालिकेत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली आहे. तसेच संबंधित नगरसेवकांनी बोलावलेल्या विशेष बैठकीतून आपलं वर्चस्व दाखवून देतानाच आत्तापर्यंत गटनेता राहिलेल्या विजय इंगळे यांचीच हकालपट्टी केली असून ठाकरेंनाच आव्हान दिलं आहे. आता सागर भारुका हे नवीन गटनेते असणार आहे. याबाबतची माहिती एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या मंगेश काळे यांनी दिली आहे.
भाजप - 38
शिवसेना शिंदे- 01+ 4 (उद्धव ठाकरेंची शिवसेना फुटलेले नगरसेवक)
राष्ट्रवादी अजित पवार - 01
ठाकरे- 06
काँग्रेस- 21
मनसे- 00
शरद पवार गट- 03
वंचित बहुजन आघाडी - 05
MIM 3
अपक्ष 1
शहर विकास आघाडी 01
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.