Satara ZP : अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीचा वाद पेटलेला असतानाच सातारा जिल्हा प्रशासनाचा मोठा निर्णय; पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालीच...

Satara ZP Sabhapati Election : सातारा झेडपी वादावर फडणवीसांनी चौकशीचे आदेश दिले. शिवसेना-राष्ट्रवादी कोर्टात जाणार असून नियमभंग प्रकरणी प्रशासनाच्या निर्णयामुळे राजकीय संघर्ष अधिक तीव्र झाला आहे.
Satara ZP
Satara ZPSarkarnama
Published on
Updated on

Satara, 24 March : जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत झालेल्या राड्यामुळे सातारा संपूर्ण राज्यात गाजत आहे. पालकमंत्री शंभूराज देसाई यांना झालेली धक्काबुक्की यामुळे विधिमंडळात हा मुद्दा गाजला आहे. त्याच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. दरम्यान, शिवसेना, राष्ट्रवादीकडून फेरनिवडणुकीसाठी कोर्टाचे दरवाजे ठोठावण्याचा निर्णय झाला आहे. हा वाद पेटलेला असतानाच नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी वादात सापडलेल्या जिल्हा प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे.

सातारा जिल्हा परिषद (Satara Zilla Parishad) अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन सदस्यांना मतदानास पोचण्यापूर्वीच अटक करण्यात आली. त्यांना मतदानापासून वंचित ठेवल्याचा मुद्दा जोरदारपणे तापला आहे. कारण त्यांच्याविरोधात ज्या जिल्हा परिषद सदस्याच्या अपहरणाची तक्रार देण्यात आली होती. त्या सदस्याने आपले अपहरण झाले नसून आपण स्वतःहून पक्षासोबत गेल्याचे लेखी दिलेले आहे. त्यानंतरही संबंधित दोन सदस्यांना मतदान करू न देताच उचलले गेले.

याच गदारोळात पालकमंत्री शंभूराज देसाई (Sambhuraj Desai) यांनी धक्काबुक्की करण्यात आली. त्यांच्या हाताला दुखापत झाली. तसेच, राष्ट्रवादीच्या एका जिल्हा परिषद सदस्याचा हात जबरदस्तीने भाजपच्या बाजूने वर करण्यात आला, असाही आरोप करण्यात आला आहे. साताऱ्यात फेरनिवडणुकीची मागणी होत असताना जिल्हा प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे.

जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीनंतर आता विषय समित्यांच्या सभापती निवडीची विशेष सभा ४ एप्रिल रोजी बोलावण्यात आली आहे. जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या अध्यक्षतेखालीच सभापतींच्या निवडी होणार आहेत.

Satara ZP
Satara ZP Controversy : साताऱ्यात राजकारण तापलं : भाजप ZP अध्यक्ष-उपाध्यक्षांनी दर्शन घेतलेले प्रीतिसंगम गोमूत्र शिंपून पवित्र करणार

जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण समिती, महिला व बालकल्याण समिती, कृषी व पशुसंवर्धन समिती, बांधकाम व आरोग्य समिती सभापतीपदाच्या निवडणुका घेण्यात येणार आहेत. त्यामध्ये ४ एप्रिलला सकाळी १० ते दुपारी १२ वाजेपर्यंत उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल करावी लागणार आहेत. या अर्जाचे नमुने त्याच ठिकाणी इच्छुकांना उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.

Satara ZP
Satara ZP : राष्ट्रवादीच्या दोन सदस्यांना मतदान का करू दिलं नाही?; सातारा पोलिसांचे धक्कादायक गौप्यस्फोट, एसआयटीला अहवाल सादर

दुपारी बारा ते साडेबारा या वेळेत प्राप्त नामनिर्देशन पत्रांची छाननी, दुपारी साडेबारा ते दुपारी एक यादरम्यान नामनिर्देशनपत्र माघार घेणे व एकनंतर आवश्यकता असल्यास मतदान घेऊन त्याचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. एकीकडे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीचा वाद राज्यात पेटलेला असताना आता जिल्हा प्रशासनाने विषय सभापती निवडीचा निर्णय घेतला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com