Shrikant Deshpande  Sarkarnama
विदर्भ

Senior Citizens remark controversy : शिंदेंच्या शिवसेनेचा शिलेदार म्हणतो, 'ज्येष्ठ नागरिक रिकामटेकडी असतात, त्यांना...'

Akola Civic Polls: Shiv Sena Shrikant Deshpande in Controversy : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे माजी आमदार श्रीकांत देशपांडे यांनी ज्येष्ठांच्या बाबतीत केलेल्या विधानामुळे वाद वाढला आहे.

Pradeep Pendhare

Akola Municipal Election : एकनाथ शिंदे शिवसेनाचे माजी आमदार श्रीकांत देशपांडे यांनी अकोल्यात केलेल्या विधानामुळे नवीन वाद निर्माण झाला आहे. पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलताना त्यांनी, ज्येष्ठ नागरिकांना फारसं काम नसतं. ते दिवसभर घरी रिकामे असतात. त्यामुळे त्यांना सोबत घेऊन प्रचार करा, असा सल्ला दिला.

हाच सल्ला आता एकनाथ शिंदे (Eknath Shinde) शिवसेनेला ऐन महापालिका निवडणुकीत अडचणीचा ठरला आहे.

शिवसेनेचे (Shivsena) श्रीकांत देशपांडे यांचे हे वक्तव्य सार्वजनिक झाले असून त्यावर विविध स्तरांतून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. ज्येष्ठ नागरिकांचा अवमान केल्याचा आरोप काही सामाजिक संघटनांनी केला आहे. निवृत्तीनंतरही अनेक वयोवृद्ध समाजकारण, सामाजिक कार्य, उद्योग व्यवसाय आणि घरगुती जबाबदाऱ्या सांभाळत असतात. त्यांची “रिकामटेकडी” अशी केलेली टिप्पणी ही अपमानास्पद असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले.

दरम्यान, बैठकीदरम्यान श्रीकांत देशपांडे यांनी कार्यकर्त्यांना मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी मोठ्या संख्येने स्वयंसेवकांची गरज असल्याचे सांगितले. त्यावेळी त्यांनी ज्येष्ठ नागरिकांचा उल्लेख करून त्यांच्याकडे “वेळ उपलब्ध असतो” असे म्हणत त्यांना प्रचारासाठी जोडण्याची सूचना केली. मात्र या वक्तव्याचा अर्थ विपर्यास होत असल्याचेही काहींचे म्हणणे आहे.

राजकीय क्षेत्रात ज्येष्ठ नागरिक हे मोठ्या प्रमाणात मतदार असून समाजातील मार्गदर्शक शक्ती मानले जातात. अशा वेळी त्यांच्याबद्दल असंवेदनशील भाष्य केल्याने नाराजी निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. विरोधी पक्षांनीही देशपांडे यांच्या वक्तव्यावर टीका करण्याची चिन्हे दिसत आहेत.

या संपूर्ण प्रकरणावर माजी आमदार किंवा त्यांच्या पक्षाकडून अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही. मात्र सोशल मीडियावर हा विषय मोठ्या प्रमाणात चर्चेत असून ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान राखत जबाबदारीने वक्तव्य करण्याची अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT