

Ahilyanagar municipal election : अहिल्यानगर महापालिका निवडणुकीतील वातावरण चांगलंच तापलं आहे. उमेदवारीचे, प्रतिस्पर्धी लढतीचे चित्र स्पष्ट झाल्याने, प्रचाराला वेग घेतला आहे. विजयासाठी कोणत्याही रणनीतीचा अवलंब करण्याचा निर्णय उमेदवारांनी घेतला आहे.
यातच आता जादूटोण्याचे प्रयोगांना देखील ऊत आला आहे. एकनाथ शिंदे शिवसेना अन् भाजप उमेदवारांमध्ये जादूटोण्याचा लिंबू सोडण्यावरून वाद उफाळला आहे. एकमेकांवर आरोप करत, चौकशीची मागणी केली आहे.
एकनाथ शिंदे (Eknath Shinde) शिवसेनेच्या उमेदवार अश्विनी जाधव यांनी, भाजपचे उमेदवार सागर मुर्तडकर यांच्या संपर्क कार्यालयाच्या बाहेर लिंबू टाकून जादूटोण्याचा गंभीर प्रकार केल्याचा आरोप केला आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालं आहे. यानंतर भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले असून, शिवसेना उमेदवाराविरोधात कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
सीसीटीव्ही असे दिसते की, दुचाकीवरून एक महिला अन् एक पुरूष येतात. मागे बसलेली महिला आपल्या हातातून हळून लिंबू टाकून, पुढे निघून जातात. माग रस्त्यावर दोन ते तीन लिंबू घरंगळत इकडे-तिकडे पडताना दिसतात. हा सर्व प्रकार काहींनी प्रत्यक्षदर्शींनी अनुभवल्याचा देखील दावा केला आहे. यावरून एकनाथ शिंदे शिवसेना आणि भाजप (BJP) पदाधिकाऱ्यांमध्ये आरोपांची राळ उडाली आहे.
भाजपचे उमेदवार सागर मुर्तडकर यांच्याकडून हा सर्व प्रकार प्रत्यक्षदर्शी पाहणारे, अजय कोहक यांनी दावा केला आहे की, एकनाथ शिंदे शिवसेना उमेदवार अश्विनी जाधव यांनी स्वतः चौकात लिंबू सोडून गेल्या आहेत. इथं चौकात लहान मुलं खेळतात. रहदारीचा रस्ता आहे, इथं लोकं, या प्रकारामुळे येण्या-जाण्यासाठी घाबरू लागले आहेत. यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी करत आम्ही पोलिस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढू, असा इशारा दिला आहे.
दरम्यान, अश्विनी जाधव यांनी पती सचिन जाधव यांच्या उपस्थितीमध्ये हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. "असा काही प्रकार झाला आहे, हे मला मोबाईलवर आलेल्या न्यूजमधून समजले. पण आम्ही असलं काही करत नाही. जाधव कुटुंब हे आध्यात्मिक आणि सुशिक्षित कुटुंब आहोत. आम्ही आध्यात्म मानतो, अंधश्रद्धा नाही. हा आमचा नेमही येण्या-जाण्याचा मार्ग आहे. तेवढं सीसीटीव्ही काढून, काहीतरी त्यातून दाखवण्याचा प्रकार केला जात आहे. विरोधकांना पराभव दिसू लागल्याने हा प्रकार केला जात आहे", असे अश्विनी जाधव यांनी म्हटले आहे.
"एखाद्या स्त्रीच्या बाबतीत एवढ्या खालच्या थराला जाऊन राजकारण करत असाल, तर ते कधीही यशस्वी होणार नाही. असला काही प्रकार आम्ही केलेला नाही. तंत्रज्ञान एवढं पुढं गेलं आहे की, काहीही होऊ शकतं. लिंबू एकदम काळं झालेलं आहे. हे काही मी थांबून करणार आहे का? या प्रकाराची चौकशी झाली पाहिजे. ज्यांनी माझ्यावर आरोप केले आहेत, त्या व्यक्तीची पार्श्वभूमी देखील एकदा तपासली पाहिजे", असे अश्विनी जाधव यांनी म्हटले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.