Vijayraj Shinde News  Sarkarnama
विदर्भ

Vijayraj Shinde News : भाजप नेते, माजी आमदार विजयराज शिंदे अपघातात जखमी; दोन महिला, विद्यार्थ्यांनाही दुखापत

Buldhana News : फडणवीसांची भेट घेतल्यानंतर दुपारी बारा वाजता हा अपघात झाला.

Mangesh Mahale

जयेश गावंडे

Akola News : बुलडाण्यातील भाजपचे नेते, माजी आमदार विजयराज शिंदे यांच्या वाहनाचा अकोला येथे अपघात झाला आहे. कुरणखेडजवळ बस आणि कारची धडक झाली. यात विजयराज शिंदे यांच्यासह चार जण जखमी झाले आहेत.

शिंदे यांच्यावर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अकोला विमानतळावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर ते अमरावतीसाठी जात असताना कुरणखेडजवळ आज (शनिवारी) दुपारी बारा वाजता हा अपघात झाला.

शिंदेंसह बसमधील दोन विद्यार्थी आणि दोन ज्येष्ठ महिला जखमी झाल्या आहेत. दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली. बुलडाण्यावरून अमरावतीच्या दिशेने जाणाऱ्या गाडीला (क्रमांक एम एच 28 ए एन २७५७) समोरून येणारी बस (क्रमांक एम एच ४० एन ९७१८) ही कारंजावरून अकोल्याच्या दिशेने जात असताना दोन्ही गाड्यांमध्ये धडक झाली.

जखमींना कुरणखेड येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आपत्कालीन बचाव पथक प्रमुख रंजीत घोगरे, शहाबाज शाहा, वीरेंद्र देशमुख, राम उमाळे, विजय माल्टे, मोहन वाघमारे, माजिद शेख यांनी आपत्कालीन बचाव पथकाच्या माध्यमातून महामार्गावरील वाहतूक सुरळीत करून वाहतूक सुरू केली. बोरगाव मंजू पोलिस ठाण्याचे योगेश काटकर त्यांच्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT