Mumbai : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्लीवारीवरून ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊतांनी खोचक टीका केली आहे. "एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या हातात काहीही नाही. फडणवीस हे मदारी असून, ते डमरू वाजवतात तसे ही दोन माकडे नाचतात. त्यामुळेच त्यांना वारंवार दिल्लीला जावे लागते," अशा शब्दांत राऊतांनी डिवचलं आहे.
ईडी, सीबीआयनेच शिवसेना फोडली...
पत्रकार परिषदेत संजय राऊतांनी सत्ताधाऱ्यांची पिसे काढली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावरही राऊतांनी तोफ डागली. "अमित शाह यांची शिवसेना फोडण्याची हिंमत नाही. ईडी, सीबीआयनेच शिवसेना फोडली आहे. ईडी, आयकर विभाग यांच्या कारवाईला घाबरून ते (एकनाथ शिंदे, अजित पवार) पळून गेले, असा गंभीर आरोप राऊतांनी केला.
त्यांची शिवसेना मेड इन चायना...
शिंदे गटावर राऊतांनी सडकून टीका केली. राऊत म्हणाले, "एकनाथ शिंदे यांचा गट म्हणजे कसली शिवसेना. शिंदेंची शिवसेना म्हणजे चायना माल. त्यांची शिवसेना मेड इन चायना आहे. कारण त्यांचे सरकारच दिल्लीने बनवले आहे. ईडी, सीबीआयने बनवले आहे."
मृत्यूचे आकडे अधिक?
राज्यातील सरकारी रुग्णालयात झालेल्या मृत्यूवर राऊतांनी टीका केली. नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगरमध्ये सुमारे दीडशे रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे आकडे अधिक असल्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.