Minister Abdul Sattar News
Minister Abdul Sattar News Sarkarnama
विदर्भ

Abdul Sattar News : कृषीमंत्र्यांसाठी कथित पथकाची वसुली ? ; सत्तारांच्या स्वीय सहायकाच्या सहभागाने खळबळ..

सरकारनामा ब्यूरों

Akola News : अकोला येथील एमआयडीसीमध्ये या कृषी विभागाच्या एका पथकाने छापा टाकल्याने खळबळ उडाली आहे, यात धक्कादायक माहिती समोर येत आहे. राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या नावावर कृषी विभागाच्या कथित पथकाने हा छापा टाकला असल्याचे उघडकीस आले आहे.

या कथित पथकात अधिकार नसलेल्या अनेक खाजगी व्यक्तींचा समावेश असल्याचे समजते. या प्रकारावरुन आता ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख आणि राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी हे मैदानात उतरले आहे. त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.

या कथित पथकात कृषीमंत्री अब्दुल सत्तारांचे स्वीय सहायक दिपक गवळी यांचा सहभाग असल्याची माहिती समोर येत आहे. या पथकानं संबधितांकडून पैशाची मागणी केल्याचा गंभीर आरोप एका खत कंपनीच्या व्यवस्थापकानं केला आहे.

या पथकाकडून पाच लाखांची मागणी केल्याचा आरोप अक्षत फर्टीलायझर्सच्या व्यवस्थापकांनी केला आहे. कृषीमंत्री अब्दुल सत्तारांसाठी पथकाची वसुली सुरू असल्याचा आरोप आमदार नितीन देशमुख आणि राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी केला आहे, कृषीमंत्र्यांच्या हकालपट्टीची मागणी देशमुख आणि मिटकरींना केला आहे.

हितेश भट्टड या वादग्रस्त व्यक्तीचा या कथित पथकात समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले. भट्टडवर यापूर्वी 2018 मध्ये बोगस खते आणि किटकनाशके विकल्याप्रकरणी नागपुरातील वाडी पोलिसांत गुन्हा दाखल असल्याची माहिती आहे. आता दिपक गवळी आणि हितेश भट्टड यांच्यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

(Edited By : Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT