BJP News : भाजप खासदार आणि अखिल भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात महिला कुस्तीपटू आक्रमक झाल्या आहेत. ब्रिजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप करण्यात आलेत. त्यामुळे ब्रिजभूषण सिंह अडचणीत आले आहेत.
भाजपा खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्या समर्थनासाठी समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा अखिलेश यादव मैदानात उतरले होते. ब्रिजभूषण सिंह यांनी याबाबत यादव यांचे आभारही मानले होते. तेव्हा राजकीय विश्लेषकांच्या भुवया उंचावल्या होत्या.
भाजपने त्यांना दूर केलं तर अखिलेश यादव त्यांना आपल्या पक्षात प्रवेश देतील, असा अंदाज बांधण्यात येत होता. पण पहिवालांच्या आंदोलनाच्या एक महिन्यानंतर अखिलेश यादव यांनी आपली भूमिका बदलली दिसते.
अखिलेश यादव यांनी आता या प्रकरणावरुन केवळ भाजपला नाही तर ब्रिजभूषण सिंह यांच्यावर निशाणा साधण्यास सुरवात केला आहे. अन्य विरोधी पक्षाच्या भूमिकेप्रमाणे अखिलेश यादव यांनी निवडणूक मुद्यांवर लक्ष केंद्रीत करण्यात सुरवात केली आहे. त्यामुळे ब्रिजभूषण सिंह यांच्यावर भाजपनं कारवाई केली तर समाजवादी पक्षातील प्रवेशाचे दार त्यांच्यासाठी बंद झाल्याचे राजकीय विश्लेषकांनी सांगितले.
विरोधी पक्षांनी ब्रिजभूषण सिंह प्रकरणी मोदी सरकारला घेरलं असताना अखिलेश यादव वेगळी भूमिका घेऊ शकणार नाही, त्यामुळे आता अखिलेश यादवही विरोधकांच्या सुरात सुर मिळवत आहेत. त्यामुळे विरोधकांचे नवीन राजकीय समीकरणं अधिक मजबूत होण्यास मदत होईल, असे बोललं जाते.
दरम्यान ब्रिजभूषण सिंह यांनी अल्पवयीन कुस्तीपटूच्या लैंगिक शोषणाच्या आरोपावर पहिल्यांदाच मौन तोडले आहे. या प्रश्नावर ब्रृजभूषण म्हणाले की - "सर्व मुद्दे न्यायालयासमोर आहेत." 15 जूनपर्यंत आरोपपत्र दाखल केले जाईल, असे आश्वासनही सरकारने दिले आहे.
आरोपपत्र दाखल करू द्या. मला आता काही बोलण्याची गरज वाटत नाही. बोलणे योग्य असेल तर बोलेल. अल्पवयीन पीडितेच्या वडिलांनी शिबिरात निवडीसाठी दुर्लक्ष केल्यामुळे 'बदला' घेण्यासाठी POCSO तक्रार दाखल केली आहे. यावर ब्रिजभूषण म्हणाले की, हे न्यायालयाचे काम आहे.ॉ
कुस्तीपटूंविरोधातील याचिकेवर आज दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात सुनावणी होणार आहे. बम बम महाराज यांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे की, विनेश फोगट, बजरंग पुनिया आणि साक्षी मलिक आणि इतर कुस्तीपटूंनी बदनामी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रृजभूषण सिंह यांच्यावर खोटे आरोप केले आहेत.
(Edited By : Mangesh Mahale)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.