Karnataka Hedgewar News : कर्नाटकातील काँग्रेस सरकारने आता पाठ्यपुस्तकावरुन राजकारण सुरु केले आहे. भाजपने पाठ्यपुस्तकांमध्ये सहभागी करुन घेतलेल्या काही व्यक्तींचा संदर्भ हटविण्यात सिद्धरामय्या सरकारने तयारी केली आहे.
सिद्धरामय्या सरकारने आता शालेय अभ्यासक्रमात असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक केशव बळीराम हेडगेवार यांचे जीवनचरित्र हटविण्यात येणार असल्याचा निर्णय घेतला आहे.
भाजप सरकारच्या कार्यकाळात अभ्यासक्रमात समावेश केलेल्या अभ्यासक्रमातील अनेक विषय हटविण्यात तयारी काँग्रेस सरकारने केली आहे. याबाबत सिद्धरामय्या सरकार लवकरच आदेश काढणार आहे. याबाबत कर्नाटकचे मंत्री दिनेश गुंडू राव यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
दिनेश गुंडू राव म्हणाले, "भाजप सरकारच्या कार्यकाळात अनेक शालेय साहित्य हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबधीत संस्थांकडे सोपविण्यात आले आहे. हे सर्व साहित्य नियमांनुसार या संस्थांना देण्यात आले आहे की नाही, याची चौकशी करण्यात येणार आहे. अनेक शालेय साहित्य हे आरएसएस संस्था आणि त्यांच्यांशी संबधित संघटनांना देण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे,"
"ज्या व्यक्तींनी देशासाठी योगदान दिले, स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेतला, अशाच व्यक्तींना समावेश अभ्यासक्रमात केला पाहिजे. व्यक्तीगत आवड येथे लक्षात घेण्यात येणार नाही," असे दिनेश गुंडू राव यांनी स्पष्ट केले. भाजपने आपली विचारधारा असलेल्या विषयांना पाठ्यपुस्तकांमध्ये समावेश करण्यात आला आहे. यावर काँग्रेस उपाययोजना करुन योग्य निर्णय घेणार आहे, असे त्यांनी सांगितले.
काँग्रेसचे आमदार बी.के हरिप्रसाद यांनी काही दिवसापूर्वी विधान केले आहे की काँग्रेस सरकारने आरएसएसचे संस्थापक केशव बळीराव हेडगेवार यांचे जीवनचरित्र काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. ते खोटे स्वातंत्रसैनिक होते, असा आरोप बी.के. हरिप्रसाद यांनी केला आहे. दक्षिणपंथीय विचारधारा असलेल्या व्यक्तींनाही अभ्यासक्रमातून हटविण्यात येणार असल्याची विश्वसनीय माहिती आहे.
दुसरीकडे, दिल्ली विद्यापीठाच्या अनेक अभ्यासक्रमांमध्ये नुकताच बदल करण्यात आला आहे. बीए राज्यशास्त्रात काही बदल करण्यात आला आहे. या पाठ्यपुस्तकात आता प्रखर हिंदुत्वाचे पुरस्कर्त, विज्ञाननिष्ठ वीर सावरकर यांच्याविषयीच्या अभ्यासक्रमाचा समावेश करण्यात आला आहे. दिल्ली विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात पहिल्यादांच वीर सावरकरांचा समावेश करण्यात आला आहे.
(Edited By : Mangesh Mahale)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.