Ambadas Danve Ram Mandir donation controversy Sarkarnama
विदर्भ

Ambadas Danve on Uday Samant : 'उदय सामंतला अक्कल तरी असली पाहिजे'; राम मंदिर देणगीप्रकरणावरून अंबादास दानवेंचा घणाघात, शरद पवारांबाबतही मोठं विधान

Ambadas Danve attacks Uday Samant over Ram Mandir donation: राम मंदिरातील कथित देणगी चोरीप्रकरणावरून शिवसेना ठाकरे पक्षाच्या 'राम रक्षा आंदोलनाला' वेग; उदय सामंतांवर टीका करताना अंबादास दानवेंचा पलटवार, गडचिरोली विमानतळ अन् आदिवासी जमिनींच्या मुद्द्यावरही सरकारवर गंभीर आरोप.

Pradeep Pendhare

Ayodhya Donation Controversy : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे राज्यात श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या कथित देणगी चोरीप्रकरणावरून राम रक्षा आंदोलन सुरू केले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला राज्यात प्रतिसाद देखील मिळत आहे. अयोध्येला देखील जाण्याची त्यांची तयारी आहे.

यावरून महायुतीमधील सत्ताधारी भाजपने उद्धव ठाकरेंवर हल्ला चढवण्यास सुरूवात केली आहे. भाजपपेक्षा एकनाथ शिंदे शिवसेनेने उद्धव ठाकरेंना हिंदुत्वादाच्या मुद्यावरून जोरदार टार्गेट केले आहे. मंत्री उदय सामंत यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना, शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते आमदार अंबादास दानवे यांच्या अक्कलेवर घणाघात केला.

श्रीराम मंदिरातील (Ram Mandir) दानपेट्यांचा चोरीचा प्रकार आता उघडकीस आला. त्यामुळे आता आंदोलन करत आहोत. पूर्वी आला असताना, तेव्हाच आंदोलन सुरू केले असते. यांना काळायला पाहिजे. उदय सामंतला अक्कल तर असली पाहिजे. घटना आता उघडकीस आली, त्यात काय आलं उशिरा शहाणपणाचं! असा टोला अंबादास दानवे यांनी लगावला.

अंबादास दानवे (Ambadas Danve) गडचिरोली दौऱ्यावर असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी महाविकास आघाडीतील शरद पवार हे महायुतीबरोबर जाणार असल्याची मुद्यावर देखील प्रतिक्रिया दिली.

अंबादास दानवे म्हणाले, "शरद पवार हे महाविकास आघाडीचे सर्वेसर्वा आहेत. ते सातत्याने भाजपच्या प्रतिगामी धोरणाला विरोध करत आलेत. त्यामुळे चर्चा होत असल्या तरी, ते एनडीए किंवा भाजपसोबत जातील असे वाटत नाही. अशा चर्चा होतच राहणार."

गडचिरोलीतील प्रस्तावित विमानतळासाठी शेतजमिनी देण्यास होत असलेल्या विरोधावर शिवसेनेची भूमिका मांडताना अंबादास दानवे यांनी, आज बहुतांश जिल्ह्याच्या ठिकाणचे विमानतळ बंद आहेत.

विमानतळाच्या परिसरातील जागा आधी उद्योगपतींनी लाटायच्या आणि नंतर त्या चढ्यादराने सरकारने विकत घ्यायच्या ही कार्यपद्धतीने राज्यात सुरू असल्याचा खळबळजनक आरोप केला.

गडचिरोलीत औद्योगिकरणाच्या नावावर मनमानी सुरू आहे. मोठमोठ्या कंपनी येऊन आदिवासींच्या जमिनी लाटत आहेत. त्यांना कोणत्याच प्रकारचे संरक्षण नाही. गडचिरोली ही केवळ सत्ताधाऱ्यांसाठी सोने की चिडिया झाले आहे, असा गंभीर आरोपही दानवेंनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT