Amit Shah Sarkarnama
विदर्भ

Amit Shah : "अमित शहा म्हणजे यशाची गॅरंटी, भाजपला विधानसभेची चिंता नाही"; कुणी व्यक्त केला कॉन्फिडन्स?

Sudhir Mungantiwar On Amit Shah : "अमित शहा निवडणुकीचे सूक्ष्म निरीक्षण करतात आणि निवडणूक सकारात्मक करतात. निवडणूक शास्त्रात अतिशय बारकाईने मार्गदर्शन करणाऱ्यांपैकी ते भाजपमधील नेते आहे," असं मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.

Rajesh Charpe

BJP News: लोकसभेतील अपयशामुळे भाजप चिंतेत आहे. विधानसभा निवडणुकीची सर्वांना धाकधूक लागली आहे. यात भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा येणार असल्याने भाजपच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

ते काय कानमंत्र देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, अमित शहा यांना ज्या भागाची जबाबदारी दिली जाते, तेथे भाजपला यश मिळते, असे सांगून चिंता करण्याची गरज नाही, असा सल्ला राज्याचे वन व सांस्कृतिक खात्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिला आहे.

अमित शहा ( Amit Shah ) मंगळवारी नागपूरला येणार आहेत. रेशीमबाग येथील सुरेश भट सभागृहात त्यांनी बैठक बोलावली आहे. ते संघटनात्मक आढावा घेणार आहेत. तसेच, विधानसभेच्या निवडणुकीची तयारी जाणून घेणार आहेत. या पार्श्वभूमीवर मुनगंटीवार यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला.

मुनगंटीवार ( Sudhir Mungantiwar ) म्हणाले, "अमित शहा निवडणुकीचे सूक्ष्म निरीक्षण करतात आणि निवडणूक सकारात्मक करतात. निवडणूक शास्त्रात अतिशय बारकाईने मार्गदर्शन करणाऱ्यांपैकी ते भाजपमधील नेते आहे. बुथवर मॅनेजमेंट करण्यातही ते निष्णांत आहेत. ते आम्हाला निवडणुकीच्या विजयाचा कानमंत्री देण्यासाठी येणार आहेत. कार्यकर्त्यांच्या बैठकीनंतर ते प्रमुख नेत्यांची एक बैठक घेणार आहेत."

"कोणावरही बेछुट आरोप करण्याची काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना सवयच आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर ते लोकप्रियतेसाठी आरोप करीत आहेत. त्यांना मुख्यमंत्री होण्याची घाई झाली आहे. ते बाशिंग बांधून तयार आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बाबतीत महाविकास आघाडी खोटे नॅरेटिव्ह पसरवत आहे. आमची आणि अजित पवार यांची भूमिका सोबत निवडणूक लढण्याची आहे," असं मुनगंटीवार यांनी स्पष्ट केलं. यावेळी त्यांनी अक्षय शिंदेच्या प्रकरणात पोलिसांच्या कारवाईवर शंका व्यक्त करणाऱ्या विरोधकांवर टीका केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT