Balasaheb Thorat Video : तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचंय का? बाळासाहेब थोरातांच्या उत्तराने वाढविला सस्पेन्स...

Maharashtra Chief Minister Issue : कार्यकर्ते उत्साही असतात. आपला नेता मुख्यमंत्री व्हावा, असे कार्यकर्त्यांना वाटत असते. शेवटी राजकारण महत्त्वाकांक्षेवरच चालत आहे. माझ्याही कार्यकर्त्यांची ती अपेक्षा असेल, त्यात काही वावगे नाही. मात्र....
Balasaheb Thorat
Balasaheb ThoratSarkarnama
Published on
Updated on

Nagpur, 23 September : कार्यकर्ते उत्साही असतात. आपला नेता मुख्यमंत्री व्हावा, असे कार्यकर्त्यांना वाटत असते. शेवटी राजकारण महत्त्वाकांक्षेवरच चालत आहे. माझ्याही कार्यकर्त्यांची ती अपेक्षा असेल, त्यात काही वावगे नाही.

मात्र, आज यावर बोलणे उचित होणार नाही. हा विषय आम्हाला वादाचा करायचा नाही, असे काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. मात्र, तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचे आहे की नाही, याचे उत्तर देताना निवडणुकीनंतर बघू , असे सांगून त्यांनी स्पष्टपणे न बोलता आपला दावा कायम ठेवला आहे.

सध्या महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये मुख्यमंत्रिपदासाठी (Chief Minister) स्पर्धा लागली आहे. विदर्भातील कार्यकर्त्यांनी घोषणा देऊन नाना पटोले यांना मुख्यमंत्री करण्याची मागणी केली. बाळासाहेब थाेरातांच्या (Balasaheb Thorat) समर्थकांनीही अशीच मागणी यापूर्वी केली होती.

ठाकरेंच्या शिवसेनेकडून उद्धव ठाकरे यांचे, तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून खासदार सुप्रिया सुळे यांचे नाव पुढे केले जात आहे. खासदार वर्षा गायकवाड यांनीही महिला मुख्यमंत्री करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वीच महायुती आणि महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) भावी मुख्यमंत्री कोण?, यावर चर्चा रंगली आहे.

Balasaheb Thorat
Mahayuti : शिवसेना-भाजपचा मोठा निर्णय; मुंबईतील 'या' मतदारसंघांची होणार अदलाबदली?

माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले, जो काही निर्णय होईल, तो आघाडीचे नेते सर्वांनुमते घेतील. कार्यकर्त्यांमार्फत वेगवेगळी नावे येत असतात. कार्यकर्ते मागणी करीत असतात. त्याकडे लक्ष देण्याची आज गरज नाही. आमच्या नेत्यांनीसुद्धा हा विषय सध्या महत्त्वाचा नसल्याचे स्पष्ट केले आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मुख्यमंत्री निवडला जाणार आहे. सध्या निवडणूक जिंकणे हेच आमच्यासाठी महत्त्वाचे आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील वातावरण हे महाविकास आघाडीला अनुकूल असल्याचे दिसून येत आहे. मुंबईचा सर्व्हेसुद्धा हेच दर्शवत आहेत, त्यामुळे आगामी निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठे बहुमत मिळणार असल्याचा दावाही या वेळी बाळासाहेब थोरात यांनी केला.

Balasaheb Thorat
Mahavikas Aghadi : काँग्रेस अन्‌ ठाकरेंच्या शिवसेनेकडून पवारांच्या राष्ट्रवादीला चॅलेंज; चंदगडमध्ये आघाडीत बिघाडी?

दुसरीकडे, महायुतीमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. जागा वाटपावरून मतभेद आहेत. तीनही पक्षांना जागा वाढवून पाहिजे आहेत, त्यासाठी त्यांच्यामध्ये रस्सीखेच सुरू आहे, असा आरोपही थोरात यांनी केला.

Edited By : Vijay Dudhale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com