Amol Mitkari & Jitendra Awhad. Sarkarnama
विदर्भ

Amol Mitkari : राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या तुतारीची ‘पुंगी’ वाजविण्याचा पुन्हा प्रयत्न

जयेश विनायकराव गावंडे

Amol Mitkari : राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटातील दोन नेत्यांमध्ये सध्या एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी तुतारी वाजवून दाखवावी आणि एक लाख घ्यावे असे ‘चॅलेंज’ देत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी आव्हाडांसाठी धनादेश लिहिला. हा धनादेश लिहिताना चुकला. चुकलेल्या धनादेशानंतर आमदार मिटकरी हे ‘ट्रोलर्स’ च्या निशाण्यावर आलेत. आता आमदार मिटकरी यांनी या सर्वांना प्रत्युत्तर दिले आहे. मी गरीब कुटुंबात जन्माला आलो आहे. मला धनादेश लिहिण्याची आव्हाडांसारखी सवय नाही. घाईगडबडीत धनादेश चुकला असेल मात्र मी पून्हा नवा धनादेश देतो असे म्हणत मिटकरींनी आव्हाड यांना पुन्हा आव्हान दिले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला निवडणूक आयोगाने तुतारी हे चिन्ह पक्षाला देण्यात आल्यानंतर या चिन्हाचे लोकार्पण सोहळा शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत रायगडावर पार पडला. या तुतारीवरुन आमदार जितेंद्र आव्हाड आणि आमदार अमोल मिटकरी यांच्यात चांगलीच जुंपल्याचे पाहायला मिळत आहे. शरद पवारांकडून जितेंद्र आव्हाड आणि अजित पवारांकडून आमदार अमोल मिटकरी हे एकमेकांवर टीका करीत आहेत. आमदार अमोल मिटकरी यांनी दिलेले ‘चॅलेंज’ शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पूर्ण केले नसल्याचे म्हणत अमोल मिटकरी यांनी एक लाखाचा धनादेश लिहिला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अमोल मिटकरींनी आव्हाड यांना पुन्हा तुतारी वाजविण्याचे ‘चॅलेंज’ दिले. हे आव्हान देताना काही अटी ठेवल्या. मिटकरींनी आव्हाडांसाठी लिहिलेला धनादेश चुकल्याने आमदार मिटकरी हे सोशल मिडीयातून ‘ट्रोल’ झालेत. आता पुन्हा आमदार मिटकरींनी आव्हाडांना ‘चॅलेंज’ दिले आहे. ‘सरकारनामा’शी बोलताना मिटकरी म्हणाले, मी गरीब कुटुंबात जन्माला आलेला व्यक्ती आहे. चेक लिहिण्याची आव्हाड यांच्यासारखी मला सवय नाही. चेक कदाचित घाईगडबडीत चुकलाही असेल. मात्र तो दुरुस्त करता येईल.

आधीचा चेक ‘कॅन्सल’ करून उद्या होणाऱ्या अधिवेशनात मी नवा चेक सहीनिशी आणतो. जितेंद्र आव्हाड यांनी तुतारी घेऊन यावी. पत्रकारांसमोर ती खरच वाजवावी. तुतारी वाजवावी पिपाणी नव्हे आणि एकट्याने तुतारीतून आवाज काढावा आणि हातोहात नवाकोरा चेक त्यांनी घ्यावा. अशा शब्दांत मिटकरींनी पुन्हा आव्हाडांना ‘चॅलेंज’ केले आहे. आपल्याला ‘ट्रोल’ करणाऱ्या लावारीस कारट्यांना चेकच्या पैशातून साधनसामग्री वाटावी असा टोलाही मिटकरींनी आव्हाडांना लगावला आहे.

टोपे दादांसोबत दिसतील!

राजेश टोपे हे लवकरच अजित दादांसोबत दिसतील असा दावा आमदार अमोल मिटकरींनी केला आहे. त्यामुळेच अजित पवार यांचा स्तुती करणारा व्हिडीओ त्यांनी पोस्ट केला आहे, असेही मिटकरी म्हणाले. त्यामुळे त्यांना ‘वेलकम’ म्हटले. काही तासांपूर्वीच टोपे त्यांच्या काही कार्यकर्त्यांसोबत दादांना भेटले. दादांवर त्यांचे प्रेम आहे, निष्ठा आहे. पुढे मतदारसंघात निवडणूक पण लढवायच्या आहेत. स्वतः त्यांचे शपथपत्र पण आमच्या सोबत आहे. त्यामुळे त्यांचे स्वागत आहे. मी पूर्वीही सांगितले की, मार्च महिना हा भूकंपाचा महिना आहे, असेही मिटकरी म्हणाले.

Edited By : Prasannaa Jakate

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT