Amol Mitkari : सत्तारूढ आमदार मिटकरींना कोणी केला धमकीचा फोन !

Ruling MLA received a threatening phone call : त्या' कथित ऑडिओ क्लिपनंतर मिटकरी विरुद्ध पोलिस संघर्ष
amol mitkari bachchan singh
amol mitkari bachchan singhsakarnama
Published on
Updated on

Akola News : जिल्हा पोलिस अधीक्षक बच्चन सिंग यांना फोन करून एका सराईत गुन्हेगारावर गुन्हा दाखल न करण्याची आग्रही मागणी करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरींना धमकीचा फोन आल्याने एकच खळबळ उडाली आहे. अकोला पोलिस अधीक्षकांच्या नावाने धमकी देण्यात आल्याचा आरोप आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे. या प्रकरणी त्यांनी अकोल्यातील खदान पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे खंदे समर्थक म्हणून आमदार मिटकरी यांच्याकडे पाहिले जाते. सत्तारूढ आमदार मिटकरींना धमकीचा फोन आल्याने याविषयी चांगली चर्चा रंगली आहे.

आमदार नितेश राणे यांनी पोलिसांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर विरोधकांकडून नितेश राणे हे टीकेचे लक्ष्य बनले होते. दरम्यान, त्यानंतर दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे विधान परिषद सदस्य अमोल मिटकरी यांनी अकोल्यातील एका सराईत गुन्हेगारावर गुन्हा दाखल न करण्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्यावर दबाव टाकला होता. मिटकरींचे आणि पोलिस अधीक्षक यांचे ते कथित संभाषण व्हायरल झाले होते. याच कथित संभाषणावरून मिटकरींना धमकीचा फोन आला आहे. आपण पोलिसांचा अपमान केला, असा आरोप करत एका युवकाकडून आमदार मिटकरींना धमकी देण्यात आली आहे. नरेश राऊत असं या युवकाचे नाव असल्याचे समजते. दरम्यान, या प्रकरणी आमदार मिटकरींनी खदान पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

amol mitkari bachchan singh
Ramdas Aathavle News: नागालँडमध्ये आठवलेंचे सरकार येणार? सत्तास्थापनेची काय आहेत समीकरणं?

उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी अकोला शहरातील खदान पोलिसांत तक्रार दिली. त्यांनी संबंधित युवकावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. धमकी देताना युवकाने आपल्याला तुमच्या घरावर आणि गाडीवर हल्ला करण्यासाठी दहा हजार रुपये मिळाल्याचा दावा केला असल्याचे मिटकरींनी तक्रारीत म्हटलं आहे. काल शुक्रवारी (ता.23) आमदार मिटकरी यांना नरेश राऊत नामक युवकाचे कॉल आले. हा कॉल करणारा युवक पोलिस बॉइज संघटनेचा पदाधिकारी असल्याची माहिती समोर येत आहे. या युवकाने मिटकरींना फोन केल्यानंतर एकेरी भाषेत मिटकरींशी संवाद साधला. आमदार अमोल मिटकरी यांना त्याने धमकी दिली. त्यानंतर या युवकाचा नंबर ब्लॉकमध्ये टाकला. दरम्यान, या सर्व प्रकरणानंतर याची संपूर्ण माहिती आमदार मिटकरी यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक बच्चन सिंह यांना दिली असल्याचे समजते.

मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांना माहिती देणार

या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस चे आमदार अमोल मिटकरी यांनी पुन्हा एकदा अकोला पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. ही धमकी पोलिसांच्या आशीर्वादाने देण्यात आली असल्याचा आरोप मिटकरींनी केला आहे. त्यामुळेच दोषी युवकावर कारवाई करण्यात येत नाही. खदान पोलिसांनी आपल्याला अतिशय अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोपही आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे. त्यामुळे याची माहीती आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देणार असल्याचेही मिटकरी यांनी म्हटले आहे.

R

amol mitkari bachchan singh
Ashok Chavan : "भाजपनं तीन दिवसांत मला राज्यसभेवर पाठवलं, आता...", चव्हाणांनी व्यक्त केला विश्वास

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com