Mitkari VS Awhad : शरद पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसला तुतारी हे चिन्ह मिळाले. या 'तुतारी'वरून राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांना पुन्हा डिवचले आहे. ही तुतारी आहे की पुंगी? असे म्हणत जितेंद्र आव्हाडांचा आमदार मिटकरींनी कुल्फीवाले म्हणून उल्लेख केला आहे.
यापूर्वी आमदार मिटकरी यांनी जितेंद्र आव्हाड यांना तुतारी वाजविण्याचे आवाहन केले होते. आता 'एक्स' या सोशल मीडियावर आव्हाड यांचा तुतारी वाजवतानाचा व्हिडिओ पोस्ट करीत मिटकरी यांनी त्यांना पुन्हा डिवचले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर आगामी निवडणुकीपूर्वी अजित पवार आणि शरद पवारांचा गट एकमेकांसमोर उभा ठाकला आहे. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला निवडणूक आयोगाने तुतारी वाजवणारा माणूस असं निवडणूक चिन्ह दिलं आहे. या चिन्हाचं अनावरण राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने किल्ले रायगडावर जाऊन केलं. या वेळी जितेंद्र आव्हाडांनी तुतारी वाजविली. यावर आव्हाडांनी आपलं आवाहन स्वीकारलं. मात्र, तुतारी वाजवण्यासाठी काही अटी शर्ती असल्याचं मिटकरींनी म्हटलं आहे. आमदार मिटकरींनी यांनी आव्हाडांना पुन्हा आव्हान दिलं आहे. आज (ता. 24) आव्हाडांचा व्हिडिओ माध्यमांना दाखवत मिटकरी यांनी पुन्हा आवाहन दिले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
मिटकरींनी तुतारी वाजवताना आव्हाडांचं पोट पुढं आलं आहे. मागचे तुतारी वादक तुतारी वाजवत आहेत. त्यामुळे आव्हाड यांनी तुतारी एकट्याने वाजवावी, असं मिटकरी यांनी म्हटलं आहे. माझ्याकडून एक लाखाचा चेक तयार आहे. त्यांनी तुतारी आणावी आणि पत्रकारांसमोर ती वाजवावी आणि एक लाखाचा चेक घेऊन जावा, असेही मिटकरी म्हणाले होते. दरम्यान, आमदार मिटकरींनी आपल्या 'एक्स' सोशल मीडियावर आव्हाड यांचा तुतारी वाजवतानाचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. या पोस्टमधून मिटकरी यांनी आव्हाड यांचा कुल्फीवाले म्हणून उल्लेख केला आहे.
ही तुतारी आहे का पुंगी?
आमदार अमोल मिटकरी आणि आमदार जितेंद्र आव्हाड या राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या नेत्यांकडून गेल्या काही दिवसांपासून एकमेकांवर जोरदार कुरघोडी सुरू आहे. अशातच राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला 'तुतारी वाजवणारा माणूस' हे चिन्ह मिळाल्यानंतर मिटकरी यांनी आव्हाड यांच्यावर मिश्किल टिप्पणी केली होती. 'आमच्याकडे उन्हाळ्यात कुल्फी विकणारे असंच वाजवतात', अशी टीका केली आहे, तर आव्हाडांचा कुल्फीवाले म्हणून उल्लेख करीत त्यांना मिटकरींनी डिवचले आहे.
Edited By : Atul Mehere
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.