Amol Mitkari | Raj Thackeray Sarkarnama
विदर्भ

Amol Mitkari : अमोल मिटकरी 'हिशेब चुकता करणार'; म्हणाले, मनसेच्या पाठीवर लाथा हाणून...

Amol Mitkari : "ज्या पक्षाचं अस्तित्वच नाही, तो पक्ष राष्ट्रवादीची रेषा खोडत महायुतीत मोठा होण्याचा प्रयत्न करत आहे," अशी टीका मिटकरींनी मनसेवर केली आहे.

Akshay Sabale

MNS News : राष्ट्रवादी काँग्रेसचे ( अजितदादा पवार ) प्रवक्ते, अमोल मिटकरी यांची कार मंगळवारी दुपारी मनसेच्या कार्यकर्त्यांनी फोडली. सुपारीबाज म्हणून अप्रत्यक्षपणे मिटकरी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका केली होती.

त्याला प्रत्युत्तर देत कार्यकर्त्यांनी मिटकरींविरुद्ध घोषणाबाजी करत त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यासह अकोला येथील विश्रामगृहाबाहेर उभ्या असलेल्या कारच्या काचा फोडल्या.

पण, माझ्यावरील हल्ल्याच्या हिशेब चुकता करणार आहे. अशा नामर्द लोकांना मी घाबरत नाही. हल्ले करून माझी वाणी आणि लेखणी कुणी थांबवू शकत नाही, असा इशारा अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी मनसेला दिला आहे. ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

"विचारांची लढाई विचारांनी लढली पाहिजे"

अमोल मिटकरी म्हणाले, "मी मनसेच्या (MNS) पक्षप्रमुखाचं नाव घेऊन टीका केली नव्हती. अजितदादांवर वक्तव्य केल्यानंतर पक्षाचा प्रवक्ता या नात्यानं उत्तर देणं माझं कर्तव्य होते. त्यानंतर मनसेच्या प्रवक्त्यांनी माझ्यावर खालच्या पातळीवर टीका केली होती. पण, मी संयम सोडला नव्हता. विचारांची लढाई विचारांनी लढली पाहिजे, ही यशवंतराव चव्हाण यांची शिकवण आहे. त्याच विचारांवर मी राजकारण करत आहे."

"ईट का जवाब पत्थर से देऊ शकतो"

"भ्याड हल्ला करून सुपारीबाजांना मर्दुमकी गाजवली असे वाटत असेल. मात्र, आमचे हात बांधलेले नाहीत. आम्ही सुद्धा 'ईट का जवाब पत्थर से' देऊ शकतो. मी विश्रामगृहाबाहेर आलो असतो, तर मोठा राडा झाला असता. अकोल्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असता. पण, मी प्रचंड संयम ठेवला," असं मिटकरींनी म्हटलं.

"माझी वाणी आणि लेखणी कुणी थांबवू शकत नाही"

"माझ्यावरील हल्ल्याचा हिशेब चुकता करणार आहे. अशा नामर्द लोकांना मी घाबरत नाही. ते मर्दाच्या पोटी जन्माला आले नाहीत. त्यामुळे असा भ्याड हल्ला करण्याचा प्रयत्न केला. माझ्या कारच्या काचा फोडून राज ठाकरे पुरस्कार देतील, असं कार्यकर्त्यांना वाटत असेल. मात्र, आजपर्यंत सुपाऱ्या घेऊन तुमचा नेता शांत बसला होता. हल्ले करून माझी वाणी आणि लेखणी कुणी थांबवू शकत नाही," असं मिटकरींनी ठणकावून सांगितलं.

"खूनशी पक्ष राजकारणात नसावे"

"पंकज साबळे आणि कर्णबाळ दुनबळे यांना विधानसभा लढवायची आहे. पण, माझ्यावर हल्ल्या करून राज ठाकरे उमेदवारी देतील, हा साबळे आणि दुनबळे यांचा गैरसमज आहे. कारण, ज्या पक्षाचं अस्तित्वच नाही, तो पक्ष राष्ट्रवादीची रेषा खोडत महायुतीत मोठा होण्याचा प्रयत्न करत आहे.

अशा खूनशी पक्षाला घेऊन महायुतीत सत्तेत येण्याचं स्वप्न पाहत असेल, तर जनता कधीही मतदान करणार नाही. यांना सोबत घेऊन आपण बुडतीचे पाय डोहाकडे राहू. यांच्या पाठीवर लाथा हाणून महायुतीतून बाहेर काढा. अशा प्रकारचे खूनशी पक्ष राजकारणात नसावे. एखाद्या आमदारावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. तर, जनतेला तलवारीनं मारतील," असं मिटकरींनी म्हटलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT