Navneet Rana’s Viral Phone Call Hospital Cleanliness Sarkarnama
विदर्भ

Navneet Rana : "नाहीतर मी तिथे येऊन धिंगाणा करेन..."; नवनीत राणांना संताप अनावर, फोनवरूनच अधिकाऱ्याला दम

Amravati District Hospital : अमरावती जिल्हा रुग्णालयातील स्वच्छतेच्या मुद्द्यावरून माजी खासदार नवनीत राणा यांचा रुद्रावतार पाहायला मिळाला. "जिल्हा रुग्णालयात स्वच्छता करा. नाहीतर मी तिथे येऊन धिंगाणा करेन"; अशा शब्दात त्यांनी जिल्हा शल्य चिकित्सकांना दम दिल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.

Jagdish Patil

Amravati News, 01 May : अमरावती जिल्हा रुग्णालयातील स्वच्छतेच्या मुद्द्यावरून माजी खासदार नवनीत राणा यांचा रुद्रावतार पाहायला मिळाला. "जिल्हा रुग्णालयात स्वच्छता करा. नाहीतर मी तिथे येऊन धिंगाणा करेन"; अशा शब्दात त्यांनी जिल्हा शल्य चिकित्सकांना दम दिल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.

अमरावती जिल्हा रुग्णालयातील अस्वच्छतेचा अनेक रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना त्रास सहन करावा लागत आहे. याबाबतची तक्रार काही कार्यकर्त्यांनी माजी खासदार नवनीत राणा यांच्याकडे केली होती. या तक्रारीनंतर राणा यांनी थेट जिल्हा शल्य चिकित्सकांना फोन करून सदर घटनेचा जाब विचारला.

फोनवर बोलताना राणा (Navneet Rana) म्हणतात की, "मी तिकडे आले तर खूप धिंगाणा होऊन जाईल. कारण मी आज रुग्णालयातील काही फोटो बघितले. तिथले वॉशरुम इतके अस्वच्छ आहेत की कोणताही गरीब पेशंट आणि इतर कुणीही तिकडे जाऊ शकत नाही. स्वच्छतेचं कंत्राट ज्यांनी घेतलं आहे ते काय करत आहेत?

सरकार एवढ्या मोठ्या प्रमाणात कंत्राटाचे पैसे देते आणि एकही माणूस तिथे जाऊ शकत नाही. एवढ्या उन्हात ते कुठे जातील?", असे अनेक प्रश्न त्यांनी यावेळी जिल्हा शल्य चिकित्सकांना विचारले. तसंच यावेळी त्यांनी कंत्राटदार कोण आहे? असं विचारत नियमित साफसफाई करणारे कोण आहेत?

आजच्या आज साफसफाई झाली नाही तर मला साफसफाई करणाऱ्यांचे संध्याकाळी फोटो पाहिजेत, असा आदेशच दिला. स्वच्छतेसह या रुग्णालयात सीरियस पेशंटचे सिटीस्कॅन होत नसल्याचा आरोप करत त्यांनी तिथे जर सिटीस्कॅन होत नाही तर मग कुठे चालू आहे? असा सवाल उपस्थित केला. शिवाय आमचे चार-चार लोकं हॉस्पिटलचं कामं करणारे आहेत.

हे सगळे मला आपल्या एका पेशंटचं अर्जंट सिटीस्कॅन करायचंय असं सांगत आहेत आणि त्याचं सिटीस्कॅन होत नाही? का होत नाही म्हणून त्यांना विचारा असंही त्या फोनवर बोलताना दिसत आहेत. त्यामुळे नवनीत राणा रुग्णालय प्रशासनावर चांगल्याच भडकल्याचं पाहायला मिळालं. तर त्यांचा हा फोनवर बोलतानाच व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT