Pune News, 01 May : पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा देशासह जगभरातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. पहलगाममध्ये झालेल्या या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर देशभरामध्ये विविध सुरक्षा विषयक उपाययोजना करण्यात येत आहेत.
सरकारसोबतच नागरिक देखील आपापल्या पद्धतीने उपाययोजना करताना पाहायला मिळत आहेत. पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील पिरंगुट ग्रामपंचायतीने स्थानिक मुस्लिम बांधवांना सोडून इतरांना मशिदीमध्ये प्रवेश बंदी घातली आहे.
या बाबतचा ठराव विशेष ग्रामसभेसमोर मांडून त्याला मंजूरी देखील देण्यात आली आहे. हा ठराव संमत करताना स्थानिक मुस्लिम बांधवांना विश्वासात घेण्यात आलं असल्याचं आणि या ठरावाला त्यांचा पाठिंबा असल्याचे देखील सांगितलं जात आहे.
हा ठराव झाल्यानंतर या निर्णयाबाबतचा बोर्ड पिरंगुट येथे लावण्यात आला आहे. या बोर्डवर गावातील मशिदीमध्ये फक्त स्थानिक मुस्लिम बांधवच प्रार्थना करतील असं लिहिण्यात आला आहे. पिरंगुटचे ग्रामस्थ व स्थानिक मुस्लिम बांधव यांच्या विशेष सभेमध्ये झालेल्या ठरावामध्ये गावामधील मशिदीमध्ये स्थानिक मुस्लिम वगळता परप्रांतीय मुस्लिम बांधव.
व्यवसायानिमित्त पंचक्रोशीमध्ये असलेले मुस्लिम व अन्य आजूबाजूच्या गावातील मुस्लिम बांधवांना सुरक्षिततेच्या दृष्टीने मशिदीमध्ये येण्यास व प्रार्थनेसाठी प्रतिबंध करण्यात आल्याचं या बोर्डवर नमूद करण्यात आलं आहे.
तसेच मशीदीच्या क्षमतेपेक्षा बाहेरून येणारे बांधव जास्त असल्याने गावाची कायदा सुव्यवस्था व शांतता यास अडथळा निर्माण होत आहे. तरी या ठिकाणी फक्त स्थानिक मुस्लिम बांधवच प्रार्थना करतील. याची इतर परप्रांतीय व पंचक्रोशी मधील मुस्लिम बांधवांनी नोंद घ्यावी असं आवाहन पिरंगुट ग्रामपंचायतकडून करण्यात आला आहे.
दरम्यान, गावच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगण्यात आलं असलं तरी या निर्णयावर वेगवेगळ्या स्तरातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. त्यामुळे या निर्णयाबाबत शासन कशा प्रकारची भूमिका घेणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Edited By Jagdish Patil
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.