Medha Kulkarni : अजितदादांची 'सकाळची वेळ' नेत्यांना गाठता येईना... मेधाताईंचा दुसऱ्यांदा हिरमोड, आता हात जोडूनच केली विनंती!

परशुराम आर्थिक महामंडळाच्या पुण्यातील नव्या इमारतीचे उद्घाटन आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते संपन्न झालं. या उद्घाटन कार्यक्रमाची वेळ ही साडे सहाची होती. मात्र त्यापूर्वीच अजितदादांनी उद्घाटन उरकलं याबाबतची नाराजी भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी बोलून दाखवली.
Ajit Pawar, Medha Kulkarni
Ajit Pawar, Medha KulkarniSarkarnama
Published on
Updated on

Pune News, 01 May : परशुराम आर्थिक महामंडळाच्या पुण्यातील नव्या इमारतीचे उद्घाटन आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते संपन्न झालं. या उद्घाटन कार्यक्रमाची वेळ ही साडे सहाची होती. मात्र त्यापूर्वीच अजितदादांनी उद्घाटन उरकलं याबाबतची नाराजी भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी बोलून दाखवली.

त्यानंतर अजित पवारांनी पुन्हा एकदा या इमारतीचं उद्घाटन मेधा कुलकर्णी यांच्या उपस्थित केलं. सकासकाळी झालेल्या या नाराजीनाट्याची चर्चा सध्या मोठ्या प्रमाणात सुरू आहे. याच चर्चांवर आता खासदार मेधा कुलकर्णी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Ajit Pawar, Medha Kulkarni
Mahayuti Government : CM फडणवीसांच्या परीक्षेत आदिती तटकरे- एकनाथ शिंदेंना डिस्टिंक्शन! अन्य मंत्र्यांचा अभ्यास पडला कमी ! 100 दिवसांचा निकाल जाहीर

पुण्यात माध्यमांशी बोलताना मेधा कुलकर्णी म्हणाल्या, "मी विषय वाढवणार नव्हते तुम्ही आला म्हणून सांगते. मी वेळेच्या आधी 10 मिनिट त्या ठिकाणी पोहोचले होते. मात्र, त्याच्या देखील आधी दहा-पंधरा मिनिटे लवकर उद्घाटन झालं. त्यामुळे नक्कीच मला वाईट वाटलं. जी वेळ घोषित करण्यात आलेली असते त्या वेळेला आम्ही हजर असतो.

मात्र, त्याच्या आधी उद्घाटन झालं तर त्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होता येणार नाही आणि मग देण्यात आलेल्या निमंत्रणांचा देखील काही उपयोग नाही. यापूर्वी देखील शिवाजीनगर येथील एका उद्घाटनाला आम्ही सकाळी लवकर पोहोचलो होतो. मात्र त्यापूर्वीच अजित पवारांनी ते उद्घाटन उरकलं होतं.

त्यामुळे माझी दादांना विनंती आहे की, रात्रीची किंवा दिवसाची कुठली ही वेळ द्या पण एक वेळ घोषित करा आम्ही वेळेत येऊ, आम्हाला एक मिनिट उशीर झाला तरी तुम्ही थांबू नका अशी दादांना विनंती राहील. मात्र, वेळेच्या दहा मिनिटे आधी येऊन देखील कार्यक्रमाला हजर राहता आलं नाही तर नक्कीच वाईट वाटणार.

Ajit Pawar, Medha Kulkarni
Top Ten News : महाराष्ट्र दिनी CM फडणवीसांचे मोठं गिफ्ट, जात जनगणनेस मंजुरी देताच जरांगेंनी केली मोठी मागणी

प्रोटोकॉलनुसार ज्यांना ज्यांना आमंत्रण होतं तिथे सगळेच येणार होतं. अनेक जण रस्त्यातच होते. तोपर्यंत हा कार्यक्रम उरकला होता.आपण बस किंवा फ्लाईट ज्यासाठी पकडण्यासाठी जातो तेच आधी निघून गेलं तर वाईट वाटणारच, असं मेधा कुलकर्णी म्हणाल्या.

तर जी वेळ घोषित केली आहे त्याआधी उद्घाटन करू नये ही आमची अजित पवारांना विनंती असणार आहे. परशुराम आर्थिक महामंडळाच्या उद्घाटन कार्यक्रमाला मी सदस्य म्हणून दहा मिनिट आधी पोहोचले होते मात्र, दादांनी वीस मिनिटांआधीच उद्घाटन केलं.

पुण्यात मी एकटीच ब्राम्हण खासदार आहे आणि महाराष्ट्रामधून फक्त दोन ब्राह्मण खासदार आहेत. त्यामध्ये एक लोकसभेमध्ये आणि दुसरे राज्यसभेमध्ये हा विषय त्या विषयाशी निगडित आहे. त्यामुळे परशुराम आर्थिक विकास महामंडळ यासाठी नक्की काम करेल. मात्र काम करण्यासाठी अशा प्रकारच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणं आवश्यक असल्याचा देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com