Amravati Guptdhan Sarkarnama
विदर्भ

Amravati Guptdhan : गुप्तधन शोधण्याची शक्ती परत मिळवण्यासाठी स्मशानभूमीत पूजाविधी; पाच जणांना अटक

Five arrested for allegedly performing a ritual at a cremation site to regain a supposed power to find hidden treasure : अमरावतीतील ब्राम्हणवाडा थडी येथील प्रकार; कथित महाराजासह चौघांवर कारवाई, पोलिस तपास सुरू

Pradeep Pendhare

Amravati Crime News : गुप्तधन शोधण्याची शक्ती कमी झाल्याच्या समजुतीतून ती पुन्हा प्राप्त करण्यासाठी स्मशानभूमीत जादूटोण्याच्या उद्देशाने पूजाविधी केल्याचा प्रकार अमरावती जिल्ह्यातील ब्राम्हणवाडा थडी येथे उघडकीस आला आहे.

याप्रकरणी पोलिसांनी कथित महाराजासह पाच संशयितांना अटक केली असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गौरव बबनराव गवळी (वय 31) यांच्या तक्रारीवरून साहेबराव गायकवाड (वय 55, रा. समतानगर, मावळ, पुणे), सुबोध भोयर, आशुतोष तायडे (रा. अकोला), नीलेश सोनटक्के (रा. अमरावती) आणि चंदू गुप्ता (रा. ब्राम्हणवाडा थडी) यांच्याविरुद्ध कारवाई (Crime) करण्यात आली आहे.

गौरव गवळी यांचा चुलत भाऊ महेंद्र राजू गवळी (वय 27) यांचे निधन झाल्यानंतर मंगळवारी हिंदू (Hindu) स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर बुधवारी गौरव यांना स्मशानभूमीत काही व्यक्ती पूजाविधी करत असल्याची माहिती मिळाली. गौरव यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता तेथे तंबाखू, चार उदबत्त्या, काडेपेटी, अत्तराची छोटी बाटली, फुटाणे आणि काळी टोपी आदी वस्तू आढळून आल्या. तसेच स्मशानभूमीजवळ एक मोटारही आढळली.

अनोळखी व्यक्तींनी महेंद्र गवळी यांच्या अंत्यसंस्काराच्या ठिकाणी जादूटोण्याच्या उद्देशाने पूजाविधी केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला. त्यानंतर ब्राम्हणवाडा थडी पोलिसांनी तपास सुरू करून पाच संशयितांना गुरुवारी अटक केली. ठाणेदार प्रशांत जाधव यांनी या कारवाईला दुजोरा दिला. पोलिसांच्या माहितीनुसार, साहेबराव गायकवाड हा या प्रकरणातील कथित महाराज असल्याचे तपासात समोर आले आहे. त्याने चौघांना सोबत घेऊन हा प्रकार केल्याचा संशय आहे.

पोलिसांनी नोंदविलेल्या जबाबानुसार, गुप्तधन शोधण्याची आपली शक्ती कमी झाल्याचा गायकवाडचा समज होता. ही शक्ती पुन्हा प्राप्त करण्यासाठी स्मशानभूमीत पूजाविधी करण्याचा बेत आखण्यात आल्याचे त्याने सांगितल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. त्यानंतर गुप्तधन सापडल्यास ते सर्वजण वाटून घेणार असल्याचेही ठरले होते, अशी माहिती तपासात समोर आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास ब्राम्हणवाडा थडी पोलिसांकडून सुरू आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT