Yuva Swabhiman Party vs BJP Sarkarnama
विदर्भ

Amravati Mahapalika : अमरावतीत नवनीत राणा विरुद्ध रवी राणा संघर्ष? युवा स्वाभिमानचा स्वबळाचा नारा; भाजपनेही ठोकला शड्डू

Ravi Rana Yuva Swabhiman vs Navneet Rana BJP in Amravati : अमरावती इथं नगरपालिका निवडणुकीत युवा स्वाभिमान पक्ष आणि भाजपमध्ये मैत्रीपूर्ण लढतीची शक्यतेने राणाविरुद्ध राणा राजकीय संघर्ष उफळण्याची शक्यता आहे.

Pradeep Pendhare

Amravati municipal election : नगरपालिका निवडणुकांमध्ये वेगळेच राजकीय पेचप्रसंग समोर येताना दिसत आहेत. अमरावतीमध्ये आमदार रवी राणाविरुद्ध त्यांच्या पत्नी माजी खासदार नवनीत राणा यांच्यात संघर्ष होण्याची शक्यता आहे. आमदार रवी राणा यांनी नगरपालिकेसाठी स्वबळाची घोषणा केली आहे. त्यांचा राष्ट्रीय युवा स्वाभिमान पक्ष निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी केली आहे.

यामुळे भाजपमध्ये असलेल्या पत्नी माजी खासदार नवनीत राणा यांची राजकीय कोंडी झाली आहे. यावर भाजपचे राज्यसभेतील खासदार अनिल बोंडे यांनी मैत्रीपूर्ण लढत झाल्यास भाजपच्या प्रचारासाठी नवनीत राणा मैदानात असतील, असा विश्वास व्यक्त केला आहे. खासदार बोंडे यांच्या या प्रतिक्रियेमुळे राणा दाम्पत्याची राजकीय कोंडी झाली आहे.

अमरावतीमधील (Amravati) आमदार रवी राणा यांच्या राष्ट्रीय युवा स्वाभिमान पक्षाने स्वबळाचा नारा दिला. कार्यकर्ते अन् पदाधिकाऱ्यांनी देखील तसा आग्रह धरत, तयारी सुरू केली आहे. आमदार रवी राणा यांनी देखील कार्यकर्त्यांनामध्ये जोश भरला आहे. तशी चाचपणी देखील केली. यानंतर मित्रपक्ष भाजपने देखील तयारी केली आहे.

भाजपचे (BJP) राज्यसभा खासदार अनिल बोंडे यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हणाले, नगरपरिषदमध्ये भाजपसाठी अत्यंत चांगलं वातावरण आहे. भाजपचे नगराध्यक्ष-नगरसेवक निवडून येतील. यातच, मित्रपक्ष राष्ट्रीय युवा स्वाभिमानकडून, आमदार रवी राणा यांचा युती संदर्भात अजून प्रस्ताव आलेला नाही. वरिष्ठांकडे आला असेल तर, मला माहिती नाही, तसं निर्देश मला वरिष्ठ स्तरावरून आलेले नाहीत, असे सांगितले.

भाजपच्या इच्छुक नगरसेवक- नगराध्यक्ष मुलाखतीमध्ये कोणी युवा स्वाभिमानचे आले नाहीत. त्यामुळे रवी राणा यांच्या राष्ट्रीय युवा स्वाभिमान सोबत युती कुठे झालेली नाही. नगरपरिषद, नगरपंचायत मध्ये युवा स्वाभिमान सोबत एखाद्या वेळेस मैत्रीपूर्ण लढत होऊ शकते. सगळ्या प्रभागात भाजपच्या कार्यकर्त्यांनी अर्ज भरले असून, कमळाचे तिकीट मागितले आहे, असे अनिल बोंडे यांनी म्हटले.

राष्ट्रीय युवा स्वाभिमान पक्षाच्या या भूमिकेनंतर, आमदार रवी राणा यांच्या पत्नी भाजपच्या माजी खासदार नवनीत राणा काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे. मात्र खासदार अनिल बोंडे यांनी, नवनीत राणा भाजपच्या नेत्या आहेत, त्या निश्चितच भाजपच्या प्रचार करतील, असा आमचा विश्वास आहे, अशी प्रतिक्रिया दिली. अनिल बोंडे यांच्या या प्रतिक्रियेमुळे राणा दाम्पत्याची कोंडी झाली आहे.

मित्रपक्ष आमने-सामने आले, तर राणा दाम्पत्य खरच एकमेकांविरोधात प्रचारात दिसतील का? अशी चर्चा आहे. माजी खासदार नवनीत राणा या पत्नी आमदार रवी राणा यांच्या राष्ट्रीय युवा स्वाभिमान पक्षाविरोधात, मैदानात दिसल्यास, भाजप विजय मिळवेल का? अशा पैजा अमरावतीमध्ये खेळल्या जाऊ लागल्या आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT