CM Mazi Ladki Bahin scheme scam Sarkarnama
विदर्भ

CM Mazi Ladki Bahin scheme scam : 'लाडकी'तील अपात्रतेमुळे सरकारला लागला 162 कोटींचा 'चुना'; महायुती पेचात, वसुली कशी?

Amravati RTI Activist Ajay Bose Exposes 162 Crore Scam in CM Mazi Ladki Bahin Scheme : अमरावती मधील आरटीआय कार्यकर्ते अजय बोस यांनी सीएम लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थ्यांवर कोटी रुपये उधळले गेल्याची माहिती समोर आणली.

Pradeep Pendhare

BJP Mahayuti government scam : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे भाजप महायुती सरकारचं आर्थिक गणितच बिघडलं आहे. योजनेचे पैसे लाभार्थ्यांपर्यंत वेळेवर पोचत नाही. या योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांना सरकारच्या इतर योजनेत कात्री देखील मारण्यात आली आहे.

आता अपात्र लाभार्थींचा शोध घेऊन, योजनेतून वेगळण्यात येत आहे. काही पुरूष लाभार्थ्यांनी देखील या योजनेचा लाभ घेतल्याचं समोर आलं आहे. ही योजना महायुती सरकारची चांगलीच डोकेदुखी ठरली आहे. आता तर अपात्र लाभार्थ्यांमुळे महायुती सरकारला 162 कोटी रुपयांचा चुना लागल्याचं माहिती अधिकारात उघड झालं आहे.

अमरावतीमधील (Amravati) आरटीआय कार्यकर्ते अजय बोस यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थ्यांची माहिती मागवली होती. या अपात्र लाभार्थ्यांनी योजनेचा लाभ घेतल्याचा आणि या योजनेत पुरूष लाभार्थ्यांचा आकडा देखील माहिती अधिकारातून समोर आला आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण (CM Mazi Ladki Bahin) योजनेत 12 हजार 431 पुरुष, तर 77 हजार 980 महिला अपात्र ठरवल्या गेल्या आहेत. गेल्या वर्षभरापासून हे अपात्र महिला आणि पुरूष योजनेचा लाभ घेत होते, अशी माहिती आरटीआयमधून समोर आली आहे.

महिला आणि पुरुष, असे दोघेही मिळून 90 हजार 411 लाभार्थी अपात्र ठरले आहेत. हे अपात्र स्त्री-पुरुष लाभार्थी गेल्या वर्षभरापासून लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत होते. या अपात्र लाभार्थ्यांमुळे महाराष्ट्र सरकारला 162 कोटी रुपयाचा चुना लागला आहे. या लाभार्थ्यांकडून हे पैसे वसूल करावे व त्यांच्यावर फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी आरटीआय कार्यकर्ते अजय बोस यांनी केलेली आहे.

योजनेचा गैरवापर करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांवरही कारवाई करण्यात येणार असल्याच संकेत मंत्री आदिती तटकरे यांनी पूर्वीच दिले आहेत. अपात्र लाभार्थ्यांना हटवून त्यांच्याकडून आर्थिक वसुली करण्यात येण्याचे देखील सांगण्यात आले होते.

'लाडकी बहीण' या योजनेतील तब्बल 42 लाख अपात्र लाभार्थ्यांनी लाभ घेतला. या अपात्र लाभार्थ्यांकडून सुमारे 6800 कोटी रुपयांचा निधी वसूल करण्याची प्रक्रिया सरकारने सुरू केल्याचे सांगितले जात होते. 29 जून 2024 रोजी या योजनेला मान्यता मिळाली, तर 30 जूनला सरकार निर्णय काढून 1 जुलैपासून योजना राबविण्यात आली. 1 जुलै ते 15 ऑक्टोबर या कालावधीत तब्बल 2 कोटी 59 लाख महिलांनी अर्ज दाखल केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT