Nagpur News: बडतर्फ सहायक पोलिस निरीक्षक सचिन वाझे याच्या पत्रानंतर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यात पुन्हा आरोप प्रत्यारोपला सुरुवात झाली आहे. देशमुख यांच्यावर भाजप नेते तुटून पडले आहेत. याला देशमुख यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले.
"माजी न्यायमूर्ती चांदिवाल यांनी एक अहवाल सरकारला सादर केला आहे. यात आपणास क्लीन चिट देण्यात आली आहे. मात्र हा अहवाल सरकार जाहीर करीत नाही. अनेकदा सरकारला विनंती केली त्यांनी अहवाल प्रसिद्ध केला नाही. सरकार आणि भाजप नेते तोंडघशी पडल्याने वाझे याचा वापर केला जात आहे," असे अनिल देशमुख यांनी सांगितले. हिंमत असेल तर चांदिवाल अहवाल सार्वजनिक करा, क्लीन चिट दिल्याने हा अहवाल गृहमंत्री देवेंद्र फडणवीस लपवत आहेत, असा आरोप देशमुखांनी केला आहे.
अनिल देशमुख म्हणाले, "आपल्यावरील आरोप खोडून काढण्यासाठी फडणवीस यांना दहशतवादी सचिन वाझेचा वापर करावा लागत आहे. माझ्याविरुद्ध कुठेलेही ठोस पुरावे भाजप नेत्यांकडे नाही. या पूर्वी गृहमंत्री असताना माझ्यावर तोंडीच आरोप करण्यात आले होते. सुमारे दीड वर्ष मला तुरुंगात ठेवले. कुठलेही पुरावे सरकारला न्यायालयात दाखल करता आले नाही. मला मेरिटवर न्यायालयाने जामीन दिला,"
फडणवीस यांचा सांगण्यावरूनच वाझे आपल्यावर आरोप करीत आहे, याचा पुनरुच्चार आज देशमुख यांनी केला. न्यायमूर्ती चांदीवाल यांनी ११महिने चौकशी केली. तो अहवाल सरकारला दिला आहे. सध्या हा अहवाल गृह विभागाकडे म्हणजेच देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. राज्य सरकाकडे असलेला १४०० पानांचा तो अहवाल समोर आणावा. राज्य सरकार उघडे पडणार असल्याने अहवाल सार्वजनिक केला जात नसल्याचा आरोपही अनिल देशमुख यांनी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.