Anil Deshmukh, Ashish Deshmukh Sarkarnama
विदर्भ

Nagpur Politics : पराभव दिसत असल्यानेच अनिल देशमुख नव्या मतदारसंघाच्या शोधात, पुतण्याचा दावा

Rajesh Charpe

Nagpur News, 06 Sep : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) कोणत्या मतदारसंघातून लढणार हे अद्याप गुपितच आहे. मध्यंतरी देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करून त्यांनी दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातून लढण्याचे संकेत दिले होते.

तर त्यांचे पुतणे व माजी आमदार आशिष देशमुख यांनीच त्यांना चॅलेंज दिले आहे. अनिल देशमुख यांनी काटोल विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवून दाखवावी असे ते म्हणाले आहेत. देशमुखांना काटोलमध्ये पराभव दिसत असल्याने ते नव्या मतदारसंघाच्या शोधात असल्याचा दावाही आशिष यांनी केला आहे.

आशिष देशमुखांनीच (Ashish Deshmukh) पहिल्यांदा अनिल देशमुख यांना पराभवाचा धक्का दिला होता. मध्येच आमदारकी सोडल्यानंतर ते आता भाजप आणि कोटल विधानसभा मतदारसंघात परतले आहेत. त्यामुळे आता तेच येथून निवडणूक लढणार असल्याची चर्चा आहे.

भाजपने (BJP) त्यांना उमेदवारी दिल्यास पुन्हा एकदा येथे काका विरुद्ध पुतण्या अशी लढत बघायला मिळेल. या मतदारसंघावर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने दावा केला आहे. त्यामुळे महायुतीच्या उमेदवारबाबत येथे संभ्रम निर्माण झाला आहे. असे असले तरी भाजपचे इच्छुक कामाला लागले आहेत.

आशिष देशमुख हे सुद्धा काटोलमध्ये सक्रिय आहेत. लोकसभा निवडणुकीपासून त्यांनी काटोल विधानसभा मतदारसंघ सोडला नाही. शुक्रवारी भाजपचे नागपूर जिल्हा निवडणूक प्रभारी कैलाश विजयवर्गीय हे काटोल विधानसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत. कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेऊन ते विधानसभा निवडणुकीची चाचपणी करणार आहेत.

या पार्श्वभूमीवर आशिष देशमुख यांनी पुन्हा एकदा अनिल देशमुख यांना टार्गेट केलं. ते म्हणाले, "काटोलमध्ये अनिल देशमुख यांच्या विरोधात वातावरण आहे. याकरिता ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर उलटसुलट आरोप करून स्वतःला चर्चेत ठेवत आहेत. महायुती सरकारने तुरुगांत डांबले असे सांगून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करीत आहेत.

काटोलमध्ये पराभवाची भीती असल्याने ते दुसऱ्या सुरक्षित मतदारसंघाच्या शोधात आहेत. तक माजी मंत्री सुनील केदार यांच्याकडून वसूली व्हावी आणि ते पैसे शेतकऱ्यांना परत मिळावे," अशी मागणीही आशिष यांनी यावेळी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT