Video Ramdas Kadam : "गुवाहाटीला गेलेले आमदार 2 तासांत 'मातोश्री'वर आणतो, पण उद्धव ठाकरेंनी..." गणपतीची शपथ घेत कदमांचा मोठा दावा

Ramdas Kadam On Uddhav Thackeray : "उद्या गणपती बसणार आहेत, मी गणपतीची शपथ घेऊन सांगतोय हे शंभर टक्के खरं आहे. त्यानंतर उद्धव ठाकरे मला म्हणाले 'हो मी तुम्हाला फोन करून सांगतो.' मात्र, त्यानंतर दुसऱ्या दिवशी शरद पवार ‘मातोश्री’वर पोहोचले."
Uddhav Thackeray, Ramdas Kadam
Uddhav Thackeray, Ramdas KadamSarkarnama
Published on
Updated on

Ramdas Kadam On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंची साथ सोडून गुवाहाटीला गेलेले आमदार मी दोन तासांत परत 'मातोश्री'वर आणतो. पण तुम्ही काँग्रेसची साथ सोडा, असं मी उद्धव ठाकरेंनी सांगितलं होतं. मात्र त्यांनी माझं ऐकलं नाही, असं मोठं वक्तव्य शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी केलं आहे.

दापोलीतील एका कार्यक्रमात बोलताना कदम यांनी शिवसेनेत फूटी दरम्यान ठाकरेंशी बोलणं झालेला किस्सा सांगितला. तसंच आगामी विधानसभेच्या निवडणुका डोळ्यांसमोर घेऊन कदम यांनी महायुती संदर्भातही मवाळ भूमिका घेतल्याचं यावेळी पाहायला मिळालं.

रामदास कदम नेमकं काय म्हणाले?

"शिवसेनेचे (Shivsena) आमदार गुवाहाटीला गेले होते. त्यावेळी मला उद्धव ठाकरेंनी फोन केला होता. तेव्हा मी म्हटलं, अजूनही वेळ गेलेली नाही. तुम्ही काँग्रेसची साथ सोडली आहे असं पत्रकार परिषद घेऊन सांगा. त्यानंतर गुवाहाटीला गेलेल्या सर्व आमदारांना खासगी विमानाने दोन तासांत 'मातोश्री'वर नाही आणलं तर माझं नाव रामदास कदम नाही."

Uddhav Thackeray, Ramdas Kadam
Assembly Election 2024 : एका पदाने वाढवले महाविकास आघाडी, महायुतीचेही 'टेन्शन'

तर आपण बोलतोय हे खरं आहे सांगण्यासाठी कदम यांनी यावेळी गणपतीची शपथ घेतली. ते म्हणाले, "उद्या गणपती बसणार आहेत, मी गणपतीची शपथ घेऊन सांगतोय हे शंभर टक्के खरं आहे. त्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) मला म्हणाले, 'हो मी तुम्हाला फोन करून सांगतो.' मात्र, त्यानंतर दुसऱ्या दिवशी शरद पवार ‘मातोश्री’वर पोहोचले आणि उद्धव ठाकरेंनी निर्णय बदलला. त्यानंतर मलाही त्यांनी निरोप दिला की, आम्ही कायदेशीर लढाई लढू, असं कदम यांनी सांगितलं.

Uddhav Thackeray, Ramdas Kadam
Girish Mahajan Politics: महाजनांकडून खडसेंचे वस्त्रहरण, म्हणाले, कन्येच्या प्रचारासाठी करताहेत बहाणेबाजी!

दरम्यान, यावेळी त्यांनी आम्हाला महायुती आम्हाला टिकवायची आहे. जर कुणी चुकत असेल तर त्यांनाही बरोबर घेऊन पुढे जायचं आहे. अनेकांना गद्दारीची व्याख्या कळलेली नाही. आम्ही नव्हे तर गद्दारी करण्याचं पाप उद्धव ठाकरेंनीच केलं असल्याचंही ते यावेळी म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com