Anil Deshmukh Sarkarnama
विदर्भ

Anil Deshmukh : प्रभाग रचनेचे नोटिफिकेशन तरी अनिल देशमुख म्हणतात, 'निवडणूक होईलच याची गॅरंटी नाही'

Maharashtra electionsl News : नागपूरमध्ये 151पैकी शंभर जागेवर निवडणूक लढण्याची आमची तयारी आहे. काही तडजोडी करण्याची आमची तयारी असल्याचेही अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले.

Rajesh Charpe

Nagpur News : महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीला सुरुवात झाली आहे. प्रभाग रचनेची अधिसूचना निवडणूक आयोगाने काढली आहे. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीच्या चर्चांना सुरुवात झाली आहे. याबाबत राज्याचे माजी गृहमंत्री आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते यांनी नागपूर महापालिकेत आमची शंभर जागांवर लढण्याची तयारी असल्याचे सांगितले. मात्र, निवडणूक होईल की नाही ? याचीही शंका त्यांनी व्यक्त केली.

नागपूर महापालिकेत सुमारे साडेतीन वर्षे आणि जिल्हा परिषदेत तीन महिन्यांपासून प्रशासक आहे. भाजपचेच लोक कोर्टात जातात. निवडणुकीवर स्थगिती आणतात. प्रभाग रचना झाल्यावरही निवडणूक स्थगित होऊ शकते. त्यामुळे प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर झाला असला तरी निवडणूक होईलच, याची शाश्वती देता येत नाही.

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्या तर आनंदच आहे. आम्ही महाविकास आघाडीसोबत समन्वय साधून त्या लढू. नागपूरमध्ये 151पैकी शंभर जागेवर निवडणूक लढण्याची आमची तयारी आहे. काही तडजोडी करण्याची आमची तयारी असल्याचेही अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले.

जयंत पाटील (Jayant Patil) यांनी स्वतःच प्रदेशाध्यक्षपद सोडण्याची तयारी आहे. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असल्याने ते तोपर्यंत कायम राहणार आहेत. युवा नेत्यावर प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात येईल, असे शरद पवार यांनी सांगितले आहे. त्यामुळे ते जो निर्णय घेतील तो सर्वांना मान्य करावा लागणार आहे.

बच्चू कडू यांच्या आंदोलनाचा आमचा पाठिंबा आहे. विधानसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान देवेंद्र फडणवीस प्रत्येक उमेदवारांच्या भाषणात सातबारा कोरा करू असे सांगत होते. सरकार येऊन सात महिने झाले आहे. त्यांनी दिलेले आश्वासन पूर्ण करावे. ते मुख्यमंत्री आहेत. याचा निर्णय त्यांनाच घ्यायचा आहे. मुख्यमंत्री यांनी आश्वासन दिले असल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांना विचाराची आवश्यकता नसल्याचे देशमुख यांनी सांगितले.

नागपूर महापालिकेच्या 2017ची निवडणुकीत जागा वाटपावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी फिस्कटली होती. त्यामुळे शेवटच्या क्षणी राष्ट्रवादी काँग्रेसचा मोठा गोंधळ उडाला होता. घाईघाईने उमेदवारांचा शोध घेऊन त्यांनी तिकीटे देण्यात आली होती. या निवडणुकीत राष्ट्रवादीचा फक्त एकच उमेदवार निवडून आला होता, असेही यावेळी अनिल देशमुख म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT