Anil Deshmukh Sarkarnama
विदर्भ

Anil Deshmukh slams Eknath Shinde : मुख्यमंत्री शिंदेंसाठी ही धोक्याची घंटा ? ; खातेवाटपावरुन अनिल देशमुखांचा टोला

Maharashtra Politics : सर्वात महत्त्वाची खाती ही राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात आली आहेत.

सरकारनामा ब्यूरो

Mumbai : राज्याच्या खातेवाटपावर नजर टाकली तर लक्षात येते की महत्त्वाची खाती भाजप आणि राष्ट्रवादीच्या वाट्याला आलेली दिसतात. खातेवाटपात तुलनेत महायुतीतील तीन पक्षाच्या सरकारमध्ये शिवसेनेला (शिंदे गट) डावलण्यात आल्याचे दिसते. राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री अनिल देशमुख (शरद पवार गट) यांनी खातेवाटपावरुन यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना टोला लगावला आहे.

अनिल देशमुख म्हणाले, "खातेवाटपात सर्वात महत्त्वाची खाती ही राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात आली आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी पुढील काळासाठी ही धोक्याची घंटा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेते अनुभवी आहेत.मुख्यमंत्री शिंदे यांना डावलून खातेवाटप केल्याचे दिसते,"

नुकत्याच झालेल्या खातेवाटपात सर्वसामान्य जनतेशी निगडीत किंवा मतदारांवर प्रभाव पाडू शकतील अशी महत्त्वाची खाती भाजप आणि राष्ट्रवादीच्या वाट्याला आली आहेत. या तुलनेत शिंदे गटाचे खच्चीकरण करण्यात आले आहे. पुढच्या मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गटातील इच्छुकांच्या वाट्याला येऊ शकतील अशी महत्वाची खातीही आता शिल्लक राहिलेली नाहीत.

जलसंपदा, पाणीपुरवठा, महसूल, गृह, कृषी, सहकार, सार्वजनिक बांधकाम, ग्रामविकास, आरोग्य आदी महत्त्वाची खाती असतात, यातील बहुतांश खाती ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपला मिळाली आहेत. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झालेल्या राष्ट्रवादीला वित्त व नियोजन, सहकार, अन्न व नागरी पुरवठा, कृषी, महिला व बालकल्याण, मदत व पुनर्वसन, वैद्यकीय शिक्षण, विशेष सहाय्य, क्रीडा व युवक कल्याण ही खाती मिळाली आहेत.

शिंदे गटाचे काही आमदार मंत्रिपदासाठी इच्चुक आहेत. पुढील मंत्रिमंडळाच्या विस्तारात आपल्याला संधी मिळेल, अशी आशा त्यांना आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे आता नगरविकास, सामान्य प्रशासन, परिवहन,सामाजिक न्याय, पर्यावरण, खनिकर्म, माहिती तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क आदी खात्यांचा कारभार आहे. शिंदे गटाच्या आमदारांसाठी परिवहन, सामाजिक न्याय, पर्यावरण, खनीकर्म या खात्यांचा पर्याय शिल्लक आहे.

(Edited By : Mangesh Mahale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT