Maharashtra Political News : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, त्यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांना तुरुंगात टाकण्यासाठी तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दबाव आणल्याचा आरोप माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला.
आता या आरोप - प्रत्यारोपांत सचिन वाझे, माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी उडी घेत अनिल देशमुख यांच्या मुलालाही ओढले आहेत. परमबीर सिंग यांनी देशमुख यांचा मुलगा सलील यांनी माझ्यापुढे गयावया केलाचा दावा केला. त्यावर सलील यांनी परबीर सिंग यांची विश्वासार्ह्यतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
तुरुंगांत असलेल्या पोलिस अधिकारी सचिन वाजे याने देशमुखांवर आरोप केल्यानंतर माजी आयपीएस अधिकारी परमबीर सिंग यांनीही देशमुखांना Anil Deshmukh लक्ष्य केले. तसेच देशमुख यांचा मुलगा खटला मागे घेण्यासाठी गयावया करत असल्याचे सांगितले. त्यावर सलील देशमुख यांनी परमबीर सिंग यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
सलील देशमुख म्हणाले, परमवीर सिंह यांची विश्वासार्हता नाही. ते कुणाच्या सांगण्यावरून परमबीर सिंग आता बोलत आहे हे समजून घेतले पाहिजे. वाजे कोणाच्या सांगण्यावरून बोलत आहे हे ही समजून घेतले पाहिजे, असेही त्यांनी म्हटले आहे.
परमबीर सिंग काय सांगतो, तो म्हणतो हातपाय जोडले. परमबीर सिंग स्वतः दाढी मिशा कापून सहा महिने कुठल्या बिळात लपून बसला होता. त्यांनी नार्को टेस्टसाठी तयारी दर्शवली आहे. पण तुझी डील देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis यांच्यासोबत झाली आहे, मग नार्को चाचणी करायची असेल, तर माझी झाली पाहिजे. पण परमबीर सिंग याची झाली पाहिजे, आणि त्या संदर्भात त्यांचीही नार्को चाचणी तयारी झाली पाहिजे, असेही सलील यांनी स्पष्ट केले.
अनिल देशमुख गृहमंत्री होण्यापूर्वी आणि परमबीर सिंग मुंबईचे आयुक्त होण्या आधी काही वेळा भेट झाली होती. मात्र त्या भेटीचा संदर्भ त्यांनी अशा पद्धतीने देणे चूक आहे. अनिल देशमुख यांच्यावर शंभर कोटी रुपये वसुलीचे आरोप झाल्यानंतर कधीच परमबीर सिंग यांच्यासोबत माझी भेट झालेली नाही, असेही सलील देशमुख यांनी सांगितले.
एंटेलिया स्फोटक प्रकरणाचा मास्टर माईंड परमबीर सिंग आहेत, असा आरोप सलील देखमुख यांनी केला आहे. परमबीर सिंग आणि सचिन वाजे यांना बोलायचे होते, तर त्यांनी आधी हे सर्व का सांगितले नाही? कोर्टापुढे जाऊन का सांगितले नाही? आता हे प्रकरण उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर आले त्यानंतरच ते पोपटासारखे बोलायला लागले आहेत, असेही देशमुख यांनी स्पष्ट केले.
परमबीर सिंग याचे स्वतःचे रवी पुजारीसारख्या गुन्हेगारांसोबत संबंध राहिले आहे. परमबीर सिंग यांच्या पत्नी आणि मुलांचे कुठल्या कुठल्या कंपनीत शेअर्स आहेत याची माहिती घेतली पाहिजे, असे आवाहनही सलील देशमुख यांनी केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.