Ajit Pawar : अजितदादा आता बारामतीतच भाकरी फिरवणार; म्हणाले, 'माझ्याकडे सगळ्यांनी राजीनामे द्या, मला...'

Ajit Pawar in Baramati NCP Worker meeting : लोकसभा निवडणुकीतील पराभव मान्य करत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आता नव्या दमाने विधानसभेच्या निवडणुकांना सामोरं जाण्यासाठी कंबर कसली आहे.
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Pune News, 05 August : लोकसभा निवडणुकीतील पराभव मान्य करत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आता नव्या दमाने विधानसभेच्या निवडणुकांना सामोरं जाण्यासाठी कंबर कसली आहे.

मात्र, लोकसभेच्या निवडणुकीत खुद्द अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या पराभवाची खंत अद्याप दादांच्या मनातून गेलेली नाही. हा पराभव त्यांच्या चांगलाचं जिव्हारी लागला आहे. याबाबतची खंत त्यांनी अनेकदा जाहीरपणे बोलून दाखवली आहे.

अशातच आता बारामती (Baramati) दौऱ्यावर आलेल्या दादांनी थेट बारामतीकरांना पराभवाचा जाब विचारला आहे.बारामती येथील वृंदावन गार्डन येथील कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना अजित पवारांनी लोकसभा निवडणुकीतील पराभवाची खंत बोलून दाखवली. शिवाय यावेळी त्यांनी सगळ्यांनी माझ्याकडे राजीनामे द्या, अशा सूचना पदाधिकाऱ्यांना दिल्या. तसंच लोकसभेला आपण कुठे कमी पडलो हे देखील त्यांनी यावेळी सांगितलं.

अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, "मागे काय झालं त्याबाबत माझी काहीही तक्रार नाही, कार्यकर्ता हा पक्षाचा कणा असतो. मी नऊ तारखेपासून राज्याचा दौरा करतोय, हा दौरा करताना मला माझं घर सांभाळावे लागेल. लोकसभेला आपण अनेक बूथवर कमी पडलो. जे झालं त्याला मी जबाबदार आहे.

Ajit Pawar
Manoj Jarange patil : "नितेश राणेंनी माझा नाद करू नये, अन्यथा...", जरांगे-पाटलांची वॉर्निंग

मला आता संघटनेत बदल करायचे आहेत. त्यामुळे, माझ्याकडे सगळ्यांनी राजीनामे द्या, असं म्हणत दादांनी पदाधिकाऱ्यांना इशारा दिला. त्यामुळे ज्यांनी कामं केलं नाही त्यांची उचलबांगडी अजितदादा करणार की काय? अशा चर्चांना आता उधाण आलं आहे.

तसंच, शहर, ग्रामीण, महिला, सगळ्या सेलच्या लोकांनी मला राजीनामे द्यावेत, पुढं काय करायचे ते मी बघतो. लोकं म्हणतात त्यात तेल ओतण्याचे काम केलं, आपल्या स्टेजवर बसायचं आणि मागे वेगळं बोलायचं. माझं काटेवाडी प्लस मध्ये गेलं म्हणून मला बोलण्याचा अधिकार असल्याचंही ते यावेळी म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यामुळे शरद पवारांच्या बारामतीमधील पदाधिकाऱ्यांवर दादांची नाराजी अद्याप असल्याचं पाहायला मिळालं.

Ajit Pawar
Prakash Ambedkar : "राज ठाकरेंवर टाडा लावून तुरुंगात टाका", प्रकाश आंबेडकरांनी का केली शिंदे सरकारकडे मागणी?

मतदान केलं नाही त्या बहि‍णींचाही फॉर्म भरा

दरम्यान, यावेळी अजित पवारांनी लाडकी बहीण योजनेवर भाष्य केलं. ते म्हणाले अनेकजण लाडकी बहीण योजना म्हणजे चुनावी जुमला असल्याचं म्हणत आहेत. पण अशा योजना वेगवेगळ्या राज्यात राबवल्या जात आहेत. संजय गांधी निराधार योजनेचे पैसे कालांतराने वाढवले.

सरकारला गरीब जनतेला मदत करायची आहे. कोणतीही योजना आणल्यावर काही त्रुटी राहतात. जिने आपल्याला लोकसभेला मतदान दिले नसेल तरी तिला फॉर्म द्या, इथे पक्ष आणू नका, अशा सूचना त्यांनी यावेळी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना दिल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com