Anil Deshmukh
Anil Deshmukh Sarkarnama
विदर्भ

Nagpur : अनिल देशमुख तुरुंगातून बाहेर आल्यानंतर पहिल्यांदाच नागपूरला जाणार; स्वागतासाठी जय्यत तयारी

सरकारनामा ब्यूरो

NCP News : राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना सीबीआय आणि ईडीच्या प्रकरणातून जामीन मिळाल्यानंतर ते आज पहिल्यांदाच नागपूरमधील आपल्या घरी जाणार आहेत. त्यामुळे त्यांच्या स्वागतासाठी राष्ट्रवादीकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे.

अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते. त्यानंतर त्यांना ईडी आणि सीबीआयकडून अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना तब्बल १४ महिन्यानंतर जामीन मिळाला. यानंतर आज देशमुख हे नागपूरमध्ये येणार आहेत. या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी त्यांच्या स्वागतासाठी तयारी करण्यात आली आहे.

देशमुखांच्या स्वागतासाठी नागपूर विमानतळापासून बाईक रॅली काढण्यात येणार आहे. तसेच ते या रॅली मार्गातील साई मंदिरात जाऊन साईबाबांचे दर्शन घेणार आहेत. या बरोबरच महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला तर संविधान चौकामध्ये जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला वंदन करत ते नागपूर येथील त्यांच्या घराकडे जाणार आहेत.

सीबीआय आणि ईडीच्या प्रकरणातून देशमुखांना जामीन मिळाला तेव्हा मुंबईतून तीन महिने तरी बाहेर जाता येणार नाही अशी अट मुंबई उच्च न्यायालयाने ठेवली होती. त्यानंतर देशमुखांनी मुंबई बाहेर जाण्याची परवानगी न्यायालयाकडे मागितली होती. न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर ते आज नागपूरला आपल्या मतदारसंघात जाणार आहेत.

दरम्यान, त्यांच्या स्वागतासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शहरात पोस्टर लावले आहेत. देशमुख हे अनेक महिन्यानंतर नागपुरातील निवासस्थानी परतणार असल्यामुळे त्यांचे नागपुरातील निवासस्थानही फुलांनी सजविण्यात आलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT