Anil Deshmukh Vs Devendra Fadnavis Sarkarnama
विदर्भ

Anil Deshmukh : अनिल देशमुखांमध्ये मोठा बदल; यावेळी तोंडी आरोपांऐवजी थेट मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र

Anil Deshmukh latest News : निवडणूक आटोपल्यानंतर हा वाद क्षमला असून आता देशमुखांनी आरोपांऐवजी यावेळी मुख्यमंत्र्यांनी पत्र लिहून कारवाईच्या नावाखाली अतिरेक करू नका, अशी विनंती केली आहे.

Rajesh Charpe

Nagpur News : मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यात यापूर्वी अनेकदा शाब्दिक चकमकी उडल्या आहेत. महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनीच आपल्यावर दबाव टाकल्याचा आरोप देशमुख यांनी केला होता तर फडणवीसांनी त्यांचा पेन ड्राईव्ह बाहेर काढण्याचा इशारा दिला होता. निवडणूक आटोपल्यानंतर हा वाद क्षमला असून आता देशमुखांनी आरोपांऐवजी यावेळी मुख्यमंत्र्यांनी पत्र लिहून कारवाईच्या नावाखाली अतिरेक करू नका, अशी विनंती केली आहे.

औरंगजेबाच्या कबरीवरून झालेल्या आंदोलनाला नागपूरमध्ये हिंसक वळण लागले होते. पोलिसांवर दगडफेक करण्यात आली होती. अनेकांच्या गाड्या जाळण्यात आल्या होत्या. याविरोध शेकडो लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी मुख्य आरोपी फहीम खानच्या विरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे. महापालिकेच्यावतीने बुलडोजर चालवून त्याचे घर जमीनदोस्त केले आहेत. नागपूरमध्ये उसळलेल्या दंगलीस जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई व्हावी, मात्र कारवाईच्या नावाखाली निर्दोष लोकांना शिक्षा देऊ नका, अशी पत्राद्वारे देशमुखांनी (Anil Deshmukh) विनंती केली आहे.

बेकायदेशीर बांधकाम तोडण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने नोव्हेंबर 2024 मध्ये काही नियम निश्चित केले आहे, असे असताना नागपूरमध्ये कारवाई करताना घर पाडण्याची घाई करण्यात आली. उच्च न्यायालयानेसुद्धा यावर नाराजी व्यक्त करून अंतरिम स्थगिती दिली आहे. अधिकृत इमारतीच्या पाडकामापूर्वी मालक किंवा रहिवाशाला किमान 15 दिवसांची नोटीस देणे न्यायालयांच्या नियमानुसार सक्तीचे आहे.

संबधित व्यक्तीला स्वत:चा बचाव करण्याची संधी देत वैयक्तिक सुनावणीसाठी तारीख निश्चित केली जावी. नोटीसीनंतर जिल्हाधीकारी वा जिल्हा मॅजिस्ट्रेट यांना ई मेलव्दारे सुचित करावे आदी नियम यासाठी लावण्यात आले आहेत. न्यायालयीन प्रक्रिया झाल्याखेरीज थेट कोणालाही आरोपी ठरवणे चुकीचे आहे. बेकायदा पध्दतीने घर पाडले असल्यास त्याचा मोबदला द्यावा, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

हिंसेचे समर्थन कुणीही करणार नाही. आरोपीचे घराचे बांधकाम जर अवैध असेल तर कायद्याने पाडा, तातडीने अशी कारवाई अपेक्षित नसल्याचे देशमुखांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. भविष्यात अशा घटना होवू नये यासाठी आपण राज्याचे प्रमुख आणि गृहमंत्री म्हणून विशेष लक्ष देण्याची मागणी अनिल देशमुख यांनी पत्रातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना केली.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT