BJP Flag Sarkarnama
विदर्भ

Maharashtra BJP: भाजपला आणखी एक धक्का; मुस्लिम लिगच्या असलम खान यांचा अर्ज अवैध

BJP Setback Aslam Khan Nomination Invalid: मतविभाजनाची थोडीफार आशाही मावळल्याने भाजपला हा जबर धक्का मानला जात आहे. या घडामोडीने भाजपचे सर्व आडाखे आणि राजकीय समिकरण बदलून गेले आहेत.

Rajesh Charpe

Nagpur News : काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव, माजी मंत्री तसेच वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अनिस अहमद यांची वेळ निघून गेल्याने त्यांना उमेदवारी दाखल करता आला नव्हती. आता मुस्लिमबहूल मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघातील मुस्लिम लिगच्या उमेदवाराचाही अर्ज अवैध ठरवण्यात आला आहे. मतविभाजनाची थोडीफार आशाही मावळल्याने भाजपला हा जबर धक्का मानला जात आहे. या घडामोडीने भाजपचे सर्व आडाखे आणि राजकीय समिकरण बदलून गेले आहेत.

मध्य नागपूर विधानसभा मतदाररसंघात मुस्लिम आणि हलबा यांची मते निर्णायक आहेत. आजवर येथून मुस्लिम आणि हलबा समाजाचाच आमदार निवडून आला आहे. अनिस अहमद येथून तीन वेळा निवडून आले होते. विलासराव देशमुख यांच्या सहकारमध्ये ते पशुसंवर्धन तसेच उच्च व तंत्र शिक्षण मंत्री होते. मुस्लिमांची संख्या लक्षात घेऊन मुस्लिम समाजाने या मतदारसंघात मुस्लिम उमेदवार द्यावा, अशी जोरदार मागणी केली होती.

येथील अनेक इच्छुक उमेदवार दिल्लीत तळ ठोकून बसले होते. मात्र, काँग्रेसने युवक काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव यांना उमेदवारी दिली. त्यामुळे मुस्लिम समाज नाराज होता. त्यानंतर अनिस अहमद यांनी बाळासाहेब आंबेडकर यांची भेट घेऊन वंचित बहूजन आघाडीत प्रवेश केला होते. त्यांना मध्य नागपूरचे उमेदवार म्हणून वंचित आघाडीने घोषित केले होते. तसेच एबी फॉर्मसुद्धा दिला होता. हा भाजपसाठी मोठा दिलासा मानला जात होता. मात्र ते वेळत पोहचले नाही. त्यामुळे त्यांना अर्जच भरता आला नाही.

मुस्लिम लिगचे उमेदवार, माजी नगरसेवक असलम खान यांच्याकडे मुस्लिमांची बहुतांश मते वळतील, अशी शक्यता वर्तविली जात होती. बुधवारी झालेल्या छननीत त्यांचा अर्ज वैध ठरवण्यात आला होता. मात्र, रात्री त्यांना निवडणूक अधिकाऱ्यांनी तुमच्या अर्जात त्रुटी असल्याचे कळवले होते.

मुस्लिम लिग मान्यताप्राप्त पक्ष असल्याने अनुमोदक म्हणून असलम खान यांच्या अर्जावर एकाच जणाची स्वाक्षरी होती. नोंदणीकृत नसलेल्या उमेदवारांच्या अर्जावर १० अनुमोदकांची स्वाक्षरी असणे बंधनकारक आहे. याशिवाय त्यांच्या अर्जावर खोडतोड होती. त्यामुळे असलम खान यांना अर्ज अवैध झाल्याचे सांगण्यात आले.

भाजपने (BJP) यावेळी हलबा समाजाचे प्रतिनिधी व माजी आमदार विकास कुंभारे यांना तिकीट नाकारले आहे. त्यांच्याऐवजी विधान परिषदेचे सदस्य प्रवीण दटके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. नाराज झालेल्या हलबा समाजाने आपले उमेदवार उभे केले आहेत. यात काँग्रेस आणि भाजपच्याही बंडखोरांचा समावेश आहे.

समाजाच्या बैठकीत एकच उमेदवार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तो चार तारखेला जाहीर करण्यात येणार आहे. या घडामोडी भाजपचे उमेदवार दटके यांच्यासाठी अडचणीच्या ठरू शकतात.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT