Satej Patil News : आर. आर. पाटलांनी केलेली सही दाखवणे म्हणजे गोपनीयतेचा भंग; सतेज पाटलांची टीका

R.R. Patil legacy and Privacy Concerns: दिवंगत नेते आर. आर. पाटील यांनी केलेली सही दाखवणं हा प्रकार म्हणजे गोपनीयतेचा भंग म्हणावा लागेल, अशी टीका माजी मंत्री सतेज पाटील यांनी केली.
Satej Patil
Satej PatilSarkarnama
Published on
Updated on

Kohalapur News : राज्यातील जनता फोडाफोडीच्या राजकारणाला कंटाळली आहे. त्यातच शिवसेनेने पुन्हा एकदा कोल्हापुरात फोडाफोडी केली आहे. त्यामुळे सर्वांचा रोष शिवसेनेवर असणार आहे. दिवंगत नेते आर. आर. पाटील यांनी केलेली सही दाखवणं हा प्रकार म्हणजे गोपनीयतेचा भंग म्हणावा लागेल.

ही सही अजित पवार यांना दाखवली कशी? हा दडपशाहीचा प्रकार म्हणावा लागेल. आर. आर. आबा हयात नसताना अजित पवार यांनी केलेले वक्तव्य दुर्दैवी म्हणावे लागेल, अशी टीका माजी मंत्री सतेज पाटील यांनी केली.

कोल्हापुरात झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी राज्य सरकारच्या कारभारावर सडकून टीका केली आहे. कोल्हापूरची जनता हे सहन करत नाही. जयश्री जाधव यांच्या प्रवेशाने आमचा विजय आणखी सुकर झाला आहे. मुख्यमंत्री यांना दीप दिवाळी घरातच साजरी करावी लागेल. कारण महाराष्ट्रातील जनता आमच्यासोबत असणार असल्याचे कॉँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी स्पष्ट केले.

महायुतीमधील खदखद बाहेर पडत आहे. नवाब मलिक यांच्याबाबत जे वक्तव्य करत ते आता पलटले आहेत. भाजप म्हणत होते ते सत्य असेल तर आता तिकीट द्यायला विरोध करायला पाहिजे होते. मात्र, मालिक यांच्या घरात दोन जागा दिल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले.

जयश्री जाधव यांनी उमेदवारी मागितली होती. त्यांची इच्छा होती. पण मी वस्तुस्थिती समजावून सांगितल्यानंतर त्यांनी मान्य केलं होतं. आम्ही फोडाफोडी करणार नाही पण आम्ही करेक्ट कार्यक्रम करणार आहोत. क्षीरसागर यांना स्वतःच्या ताकदीवर निवडून येण्याचा विश्वास नव्हता. त्यामुळं त्यांनी फोडाफोडीचे राजकारण सुरू केले आहे, असे सतेज पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

Satej Patil
Shivsena News : शिवसेनेच्या पायाखालची वाळू सरकली; माजी मंत्री सतेज पाटलांचे गंभीर आरोप

जी फोडाफोडी सत्ता स्थापन करताना झाली. तशीच फोडाफोडी कोल्हापुरात झाली. कोल्हापुरातील काँग्रेसच्या माजी आमदार जयश्री जाधव यांना पक्षात घेतले. जे या पक्ष प्रवेशासाठी घेऊन गेलेत त्यांना जिंकण्याची खात्री नसल्याने हा प्रवेश करून घेतला.

खासगी विमानाने त्यांना कोल्हापुरातून मुंबईला घेऊन गेले. त्यांच्यावर दबाव होता की आणखी काय होतं हे जयश्री जाधव सांगतील. मात्र, कोल्हापूरची जनता हे सहन करणार नाही. उमेदवारीबाबत त्यांच्याशी बोललो होतो, त्या नाराज नव्हत्या. मात्र, कोणता दबाव त्यांच्यावर होता हे त्याच सांगतील, असे सतेज पाटील यांनी सांगितले.

Satej Patil
Kothrud Assembly : कोथरूडमध्ये हायव्होल्टेज लढत; 'मविआ'चा प्रचार सुरू

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com